Marathi News> मनोरंजन
Advertisement

समुद्रकिनारी प्रियांका- निकच्या प्रेमाला उधाण; Romantic असतानाच कॅमेरानं टिपलं आणि...

अथांग समुद्राच्या काठावर उभं असताना या सेलिब्रिटी जोडीच्या प्रेमाला उधाण 

समुद्रकिनारी प्रियांका- निकच्या प्रेमाला उधाण; Romantic असतानाच कॅमेरानं टिपलं आणि...

मुंबई : एका मुलीची आई असणारी प्रियांका चोप्रा सध्या तिच्या कामाच्या व्यापातून काही निवांत क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे. पती, अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत प्रियांका खास क्षण व्यतीत करत आहे. सलगचं चित्रीकरण, कलाजगताव्यकतिरिक्तही असणारा कामाचा व्याप या साऱ्यातून वेळ काढत ही जोडी नात्यालाही पुरेसा वेळ देताना दिसत आहे. (Bollywood Actress Priyanka chopra shares romantic photos with husband nick jonas)

निसर्गरम्य ठिकाणी, समुद्राच्या काठावर कुठे प्रियांका विसावताना दिसते, तर निळ्याशार पाण्यात चिंब भिजताना दिसते. निकच्या मिठीत स्थिरावते, तर कुठे अथांग समुद्राच्या काठावर उभं असताना या सेलिब्रिटी जोडीच्या प्रेमाला उधाण येताना दिसतं. 

प्रियांकानं हे सर्व कॅमेरामध्ये कैद झालेले क्षण सर्वांच्या भेटीला आणले आहेत. अर्थात तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट करत हे फोटो शेअर करत आहे. जिथं प्रियांका बिच लूक, बिकीनी लूक आणि स्विमसूट लूक फ्लाँट करताना दिसत आहे. 

प्रियांकाचं पाण्यावर असणारं प्रेमक कधीच चाहत्यांपासून लपलं नाही. तिच्या या नव्या Romantic पोस्टमधूनही पुन्हा हेच प्रेम जगासमोर येत आहे. लेकिच्या जन्मानंतर बऱ्याच दिवसांनी प्रियांका आणि निक असे निवांत क्षण अनुभवताना दिसत आहे. तिच्या या फोटोंना कमाल लाईक्सही मिळताना दिसत आहे. 

Read More