Marathi News> मनोरंजन
Advertisement

स्वयंवर नव्हे थेट लग्न, राखीच्या घरीही लग्नसराई

लग्नसराईचे वारे सर्वत्र वाहात असतानाच आता आयटम गर्ल राखी सावंतही याचा एक भाग झाली आहे. 

स्वयंवर नव्हे थेट लग्न, राखीच्या घरीही लग्नसराई

मुंबई : लग्नसराईचे वारे सर्वत्र वाहात असतानाच आता आयटम गर्ल राखी सावंतही याचा एक भाग झाली आहे. सोशल मीडियावर राखीने थेट तिची लग्नपत्रिका पोस्ट केली असून, अनेकांना धक्काच दिला आहे. विविध कारणांनी सोशल मीडियाच्या वर्तुळात चर्चेत असणाऱ्या दीपक कलाल याच्यासोबत ती विवाहबंधनात अडकणार आहे. 

आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ देत दोन मनं एकत्र येणार आहेत, असं तिच्या लग्नाच्या पत्रिकेवर लिहिण्यात आलं आहे. त्याशिवाय तिच्या पत्रिकेवर लग्नाचं ठिकाण आणि वेळही नमूद करण्यात आलं आहे. 

राखीने लग्नपत्रिका पोस्ट केल्यानंतर दीपकनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली. मुख्य म्हणजे सोशल मीडियावर या लग्नाच्या बऱ्याच चर्चा होत आहेत. अनेकांनी या सोहळ्याविषयी आश्चर्य व्यक्त करण्य़ासही सुरुवात केली आहे. 

 
 
 
 
A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

सुरुवातीला या अफवा असल्याचं म्हटलं गेलं. पण, खुद्द राखीनेच इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधत याविषयीची माहिती दिली. 'हो हे खरं आहे. आम्ही लग्न करत आहोत. सध्या कलाविश्वात सर्वजण लग्नबंधनात अडकत असल्यामुळे एका नव्या प्रवासाला सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ आहे. दीपकने मला इंडियाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमावर असताना लग्नाची मागणी घातली होती. ज्यानंतर मी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नुकतीच आम्ही लग्नाची तारीख निश्चित केली असून, लवकरच लग्नाच्या तयारीलाही सुरुवात होणार आहे. ज्याविषयी मी सर्वांना माहिती देत राहिनच', असं ती म्हणाली. 

 

Read More