Marathi News> मनोरंजन
Advertisement

लोकप्रिय निर्मात्याच्या मुलासोबत अभिनेत्रीचं 'खुल्लम खुल्ला प्यार', Video Viral

अर्थात या 'खुल्लम खुल्ला'ला काही मर्यादा आहेत हे नाकारता येत नाही.   

लोकप्रिय निर्मात्याच्या मुलासोबत अभिनेत्रीचं 'खुल्लम खुल्ला प्यार', Video Viral

मुंबई : 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो....', हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच. प्रेम करण्यासाठी कशाला कुणाची भीती, असं म्हणत प्रेमी युगुल हे नातं जगत असतं. यामध्ये सर्वच प्रेमी युगुलांचा समावेश होतो असं म्हणालयाल हरकत नाही. अर्थात या 'खुल्लम खुल्ला'ला काही मर्यादा आहेत हे नाकारता येत नाही. 

अचानकच हे गाणं आठवण्याचं कारण म्हणजे नुकतंच एका बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला. 

व्हिडीओमध्ये ती प्रियकर आणि लोकप्रिय निर्मात्याच्या मुलासोबत सर्वांसमोरच आपलं प्रेम जाहीरपणे व्यक्त करत त्याचा हात धरून चालत येताना दिसत आहे.

ही अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत सिंग आणि तिच्यासोबत असणारा हा सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता जॅकी भगनानी. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये रकुल आणि जॅकी एका कॅफेतून बाहेर पडताना दिसत आहेत. इथं ते एकमेकांचा हात पकडून छायाचित्रकारांच्या गर्दीतून वाट काढताना दिसत आहेत. 

तिथं रकुलला कारपर्यंत सोडल्यानंतर जॅकी काही चाहत्यांसोबत फोटोही काढत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. सध्याच्या घडीला चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटी जोड्यांमध्ये जॅकी आणि रकुलच्याही नावाचा समावेश असल्याचं दिसून येतं. 

Read More