Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' कारणामुळे पतीसोबत होतो वाद; राणी मुखर्जीचा उलगडा

तिने हीच महत्त्वाची बाब अधोरेखित केली

'या' कारणामुळे पतीसोबत होतो वाद; राणी मुखर्जीचा उलगडा

मुंबई : पती-पत्नीचं नातं किंवा कोणतंही नातं म्हटलं तर त्या नात्यात चढ उतार हे आलेच. प्रत्येक वेळी गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असं नाही. त्यामुळे अनेकदा कैक कारणांनी नात्यांमध्ये वाद निर्माण होतात. अगदी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी मंडळींची नातीही याला अपवाद नाहीत. 'मर्दानी २' Mardaani 2 या चित्रपटामुळे सध्या प्रकाशझोतात असणाऱ्या अभिनेत्री राणी मुखर्जी हिने नुकतच तिच्या पतीसोबतच्या नात्याचं उदाहरण देत हीच महत्त्वाची बाब अधोरेखित केली. 

अभिनेत्री नेहा धुपिया हिच्या No Filter Neha season 4 या कार्यक्रमात नुकतीच राणीने हजेरी लावली होती. तेव्हाच गप्पांच्या ओघात तिने काही गोष्टींचा उलगडा केला. वैवाहिक नात्याविषयी बोलत असताना तिने पती आदित्य चोप्रासोबत आपला वाद नेमका कोणत्या कारणावरुन होतो, हेसुद्धा सांगितलं. 

आपल्या चार वर्षाच्या लेकीवरुन म्हणजे आदिरावरुन अनेकदा पतीसोबत मतभेद होत असल्याचं राणी या कार्यक्रमादरम्यान म्हणाली. 'जेव्हा तुम्ही एका बाळाचं पालकत्व स्वीकारता तेव्हा मतभेद होणार हे धरुन चालावं', असं राणी म्हणाली. अर्थात भावनांचा ओलावा असणारा वाद हा काही दीर्घकाळासाठी नसतो. एकिकडे आईचं मन तर दुसरीकडे वडिलांचं मन, अशाच काहीशा मुद्द्यांवरुन मतभेद झाले तरीही राणी आणि आदित्य यांच्या नात्यात हा वाद फार काळ टीकत नाही. 

विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

आदित्य चोप्रासोबतचं राणीचं हे नातं पाहता खऱ्या अर्थाने ही सेलिब्रिटी जोडी अनेकांनाच #CoupleGoals देण्यासोबतच #ParentingGoalsही देत आहे असंच म्हणावं लागेल. सध्याच्या घडीला राणी मुखर्जी ही एक अभिनेत्री असण्यासोबतच एक आई, पत्नी आणि सून अशा विविध भूमिका तितक्याच जबाबदारीने पार पाडत आहे. तिचा हाच अंदाज अनेकांची मनं जिंकणारा ठरत आहे. 

Read More