Marathi News> मनोरंजन
Advertisement

पर्वा बी कुणाची! वाढलेलं वजन फ्लाँट करणाऱ्या समीरा रेड्डीला ओळखणं कठीण, पण...

आधी समीरा रेड्डीचं हे Body Transformation पाहा   

पर्वा बी कुणाची! वाढलेलं वजन फ्लाँट करणाऱ्या समीरा रेड्डीला ओळखणं कठीण, पण...

मुंबई : (Bollywood) बॉलिवूडमध्ये अशा कैक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अभिनयासोबतच सौंदर्या्च्या बळावरही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव गेतला. बड्या कलाकारांसोबत एकेकाळी स्क्रीन शेअर केल्यानंतरही आता मात्र याच अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून दूर, आयुष्य जगत आहेत. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री  समीरा रेड्डी (Sameera Reddy). 

समीरानं हल्लीच सोशल मूीडियावर काही फोटो शेअर केले. जिथं तिला ओळखणंही कठीण वाटतंय. पण. याचा तिला काहीच फरक पडत नाहीये. किंबहुना हे फोटो शेअर करत तिनं एक पटण्याजोगा संदेशही सर्वांना दिला आहे. (Bollywood actress sameera reddy Transformation photos)

माझं माझ्या शरीरावर प्रेम आहे, मी शरीराशी प्रामाणिक आहे. माझ्याविषयी इतर काय विचार करतील, याचाच मी गेले काही वर्ष विचार करत होते. मला इथवर पोहोचण्यास फार वेळ लागला, असं तिनं या कॅप्शनमध्ये लिहिलं.

शरीर बदलतं आणि आपण जाणाऱ्या प्रत्येत दिवसासोबतच त्याबाबत समजणं आवश्यक असल्याचा संदेश तिनं दिला. स्वत:शीच तोडून वागू नका, तुमच्याकडे जे आहे त्यात सकारात्मपणे सहज होण्याचा प्रयत्न करा असं तिनं सांगितलं. 

अपेक्षापूर्तीसाठी अशक्य गोष्टींच्या मागे धावण्याची काहीच गरज नसल्याचाच रोख समीराच्या या कॅप्शनमध्ये पाहायला मिळाला. साचेबद्ध गोष्टींची चौकट मोडण्याकडेच समीराचा कल पाहायला मिळाला आहे. तिची ही पोस्ट म्हणजे त्याचच एक उदाहरण. 

Read More