Marathi News> मनोरंजन
Advertisement

सचिन पिळगावकरांच्या लेकीनं तब्बल 18,000 फुटांवरून निर्धास्त मारली उडी; थरारक अनुभव कॅमेरात कैद

shriya pilgaonkar instagram: थरारक अनुभव घेण्याची अनेकांचीच इच्छा असते. हे अनुभव मग प्रवासाशी संबंधित असो किंवा आणखी कोणत्या मुद्द्याशी...   

सचिन पिळगावकरांच्या लेकीनं तब्बल 18,000 फुटांवरून निर्धास्त मारली उडी; थरारक अनुभव कॅमेरात कैद

shriya pilgaonkar instagram: कामाच्या व्यापातून वेळ काढत, स्वत:साठी काही वेळ खर्ची घालत थेट परदेशवेरीवर गेलेल्या एका बी- टाऊन अभिनेत्रीनं सध्या कमालच केली आहे. न्यूझीलंडमध्ये पोहोचलेली ही अभिनेत्री आहे श्रिया पिळगावकर. 

श्रिया कायमच तिच्या भूमिकांसाठी आणि कलाजगताबाहेर असणाऱ्या तिच्या मित्रमंडळींसाठी चर्चेत असते. आयुष्य अगदी स्वच्छंदीपणे जगण्याची तिची अदा अनेकांचच मन जिंकून जाते. अशी ही श्रिया पुन्हा एकदा जगण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसली. यावेळी ती पोहोचली न्यूझीलंडला. जिथं तिनं विस्तीर्ण आभाळातून साधारण 18000 फुटांवरील उंचीवरून उडी मारली आणि स्कायडायव्हिंग करतानाचा हा थरारक अनुभव तिनं सर्वांसोबत शेअर केला. 

एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर हवेचा दाब आणि गुरुत्वाकर्षणाचं अचूक गणित साधत पृथ्वीच्या पृष्ठाच्या दिशेनं उडी मारण्याचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार नेमका कसा असतो, याचीच प्रचिती श्रियाचे फोटो पाहताना येत आहे. सचिन पिळगावकरांची ही लेक कायमच साचेबद्ध गोष्टींना शह देत, मनाला पटण्याजोग्या गोष्टी करताना दिसते. फिरण्याचा छंदही जोपासताना दिसते. 

कामाचा व्याप कितीही असो, पण भटकंतीवर असणारं प्रेम व्यक्त करत आवडीच्या ठिकाणी जाणं आणि तिथं स्वच्छंदी वावरणं ही श्रियाची अदा कायमच चाहत्यांची मनं जिंकून जाते. यावेळीसुद्धा ती यात अपयशी ठरलेली नाही. श्रियानं अनुभवलेला हा थरार तिच्यासमवेत असणाऱ्या इतर काही कलाकार मित्रांनीही अनुभवला, ज्यामध्ये रॅपर चिता, अभिनेत्री श्वेता त्रिपाठी यांचाही समावेश होता. 

भटकंती आणि श्रिया, एक अनोखं नातं... 

श्रियाला तिच्या आजोबांकडून, म्हणजेच तिच्या आईच्या वडिलांकडून भटकंतीचा हा वारसा मिळाला आहे. किंबहुना आजोबांसमवेतही तिनं अशाच काही धमाल सहली केल्या आहेत. वाढत्या वयाचा आकडा कधीच आवडीनिवडींच्या आड येत नाही, हेच दाखवून देणारे आजोबा श्रियाला तिच्या या प्रवासामध्ये कायमच साथ आणि प्रेरणा देतात हेच या अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून लक्षात येतं. 

Read More