Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sonakshi Sinha सोबत 'तो' अखेर दिसलाच! Boyfriend चा हात धरून...

या लीक झालेल्या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा व्हाईट सूटमध्ये फारच सुंदर दिसते आहे. 

Sonakshi Sinha सोबत 'तो' अखेर दिसलाच! Boyfriend चा हात धरून...

Actress Sonakashi Sinha Spotted With Boyfriend: आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Actress Sonakashi Sinha) सध्या तिच्या डेटिंगच्या चर्चांमुळे माध्यमांमध्ये चर्चेत असते. दबंग (Dabbaagg) या चित्रपटांमुळे सोनाक्षीला विशेष लोकप्रियता मिळाली. आजही सलमान खान आणि सोनाक्षीची (Salman Khan and Sonakashi Sinha) जोडी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. 

सोनाक्षी सध्या चित्रपटांमधून फारशी दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती आपले नवनवीन व्हिडीओज आणि रिल्स सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या या फोटोजना आणि रिल्सना चाहते खूप लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. नुकताच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात सोनाक्षी सिन्हा आपल्या बॉयफ्रेंडसोबत झहीर इकबालसोबत (Sonakashi Sinha Spotted with Boyfriend Zaheer Ikbal) एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे तिच्या डेटिंगच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. 

या लीक झालेल्या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा व्हाईट सूटमध्ये फारच सुंदर दिसते आहे. रेस्टॉरंटच्या बाहेर पडताना सोनाक्षी तिच्या बॉयफ्रेंडसह तिच्या मित्रमैत्रीणींसोबतही दिसली. यावेळी रेस्टॉरंटच्या आत आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. जो फोटो तिच्या मित्रानं वरूण शर्मानं (Varun Sharma) इन्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. 

गेली दोन वर्ष सोनाक्षी सिन्हा आणि तिचा बॉयफ्रेंड झहीर इकबाल यांच्या अफेअरची चर्चा आहे. किंबहूना ते दोघं कधी लग्न करतील याकडेही त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आता नाईट पार्टीच्या निमित्तानं ते दोघं पुन्हा एकदा स्पॉट झाल्यानं तिच्या लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. 

fallbacks

समोर आलेल्या फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि इहीर एकमेकांचे हात हातात घेऊन रेस्टॉरंटमध्ये आपला रोमॅण्टिक क्षण व्यतित करताना दिसत आहेत. यावेळी फोटोग्राफर्सनी त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हारयल केले आहेत. त्यातून सोनाक्षी फोटोग्राफर्ससमोर फार मोकळी दिसत असली तरी यावेळी झहीर मात्र चेहरा लपवताना दिसला. 

Read More