Marathi News> मनोरंजन
Advertisement

BFFs च्या साथीने सोनाली देतेय नवे फॅशन गोल्स....

पाहा तिची ही अदा.... 

BFFs च्या साथीने सोनाली देतेय नवे फॅशन गोल्स....

मुंबई : कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला लढा दिल्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे भारतत परतली. उपचारासाठी म्हणून भारताबाहेर, आपल्या लोकांपासून दूर असूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने सर्वांशीच असणारं नातं अगदी सुरेखपणे जपलं होतं. याच नात्याच्या बळावर एका अर्थी तिला आजाराशी लढण्यासाठी काही अंशी सकारात्मकताही मिळाली. आपल्या आजारपणाविषयी चाहत्यांशी मोकळेपणाने संवाद साधणारी हीच अभिनेत्री आता सर्वांना फॅशन गोल्स देत आहे. अर्थात तेही सोशल मीडियाच्याच माध्यमातून. 

सोनालीने नुकतच तिच्या खास मैत्रिणी सुझॅन खान आणि गायत्री जोशी यांच्यासह एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याच निमित्ताने तिने सोशल मीडियावर या खास क्षणांचे फोटोही शेअर केले. या फोटोंमध्ये सोनालीचा एकंदर लूक पाहता तिची अदा पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकणारी ठरत आहे. पीच रंगाची पटियाला प्रकारातील पँट, त्याच रंगाचा बेल्ट, काळ्या रंगाट्या टॉपवर पीच रंगाच्या कोटची दिलेली जोड, असा तिचा एकंदर लूक या फोटोत पाहायला मिळत आहे. डोळ्यांवर हलकासा मेकअप आणि तोकड्या केसांतही खुलून आलेलं सोनालीचं सौदर्य हा लूक परिपूर्ण ठरवत आहे. 

सोनाली तिच्या या एकाच फोटोमुळे नव्हे, तर यापूर्वीही अनेक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर या आजारावरील उपचारासाठी म्हणून पूर्णपणे केस कापण असो, किंवा त्यानंतर एका नव्या लूकला पसंची देणं असो. आपल्या शरीरात होणारे बदल आणि त्याचे परिणाम या साऱ्याकडे सोनालीने सकारात्मकतेने पाहिलं आणि चाहत्यांना साचेबद्ध फॅशन गोल्सच्या पलीकडे जाऊन फॅशनचीच एक नवी दृष्टी दिली. सध्या सोनाली या आजारातून जवळपास सावरली असून, विविध कार्यक्रमांना आणि कलाविश्वात पुन्हा एकदा उत्साहात वावरु लागली आहे. त्यामुळे येत्या काळात बी- टाऊनची ही मराठमोळी अभिनेत्री मोठ्या पडड्यावर झळकणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Read More