Marathi News> मनोरंजन
Advertisement

पॉर्न स्टारच्या प्रेमात पडला अन् तिच्यासोबतच कामही करु लागला; सेलिब्रिटी कपलची अफलातून Love Story

सुरुवातीच्या काळात बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला होता. पण.... 

पॉर्न स्टारच्या प्रेमात पडला अन् तिच्यासोबतच कामही करु लागला; सेलिब्रिटी कपलची अफलातून Love Story

मुंबई : बॉलिवूडमध्ये बऱ्याच सेलिब्रिटी जोड्यांची नावं या न त्या कारणामुळे चर्चेत असतात. पण, एक जोडी मात्र त्यांच्या अनपेक्षित नात्यामुळं आणि नात्यात आलेल्या वळणांमुळं चर्चेत आली आहे. पाहता पाहता प्रसिद्धीझोतात आलं आणि सर्वांच्याच नजरा या जोडीवर खिळल्या. (Sunny Leone Daniel Weber)

सनी सुरुवातीला एक पॉर्न स्टार म्हणून ओळखली जात होती. पण, लग्नानंतर मात्र ती या क्षेत्रापासून दूर गेली. पण, पॉर्न स्टार म्हणून ओळख अस्तित्वात असल्यामुळं बॉलिवूडमध्ये सनीला सुरुवातीच्या काळात बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला होता. पण, पती डॅनिअलनं तिची साथ सोडली नाही. 

सनी आणि तिचा पती डॅनिअल यांची प्रेमकहाणी तशी फारच रंजक. एका बँड मेट क्लबमध्ये त्यांची पहिल्यांदाच भेट झाली होती. डॅनिअल पहिल्याच नजरेत सनीच्या प्रेमात पडला होता. तर, सनीनं मात्र कोणा व्यक्तीला आपण भेटलो अशीच प्रतिक्रिया दिली होती. 

पुढे त्यांच्यात बोलणं वाढलं, फोन नंबर देणं झालं आणि मेलवर बोलणंही झालं. नातं प्रगल्भ होत असतानाच एके दिवशी डॅनिअलनं सनीला डेटसाठी विचारलं. 

fallbacks

सनी आणि डॅनिअल लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. ती तिथं अडल्ट व्हिडीओ शूट करत होती. पण, कोणा दुसऱ्याच व्यक्तीसोबत तिनं असे व्हिडीओ शूट करणं डॅनिअलच्या पसंतीस पडलं नाही. 

शेवटी त्यानंच सनीसोबत पॉर्न फिल्मचं चित्रीकरण करण्यास सुरुवात केली, आपली निर्मिती संस्थाही सुरु केली. दरम्यानच्या काळात सनीच्या आईचं निधन झालं आणि याच वेळी डॅनिअलनं तिला मोठा आधार दिला. या जोडीसाठी नात्यातल हे मोठं वळण होतं. 

fallbacks

सनी आणि डॅनिअल या दोघांनीही काही काळानं लग्न करण्याचा निर्णय घेतला. नात्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी एकमेकांना आधार दिला आणि हे नातं आणखी दृढ केलं. 

Read More