Marathi News> मनोरंजन
Advertisement

ब्रेकअपच्या चर्चांना सुष्मिताचं थेट उत्तर

पाहा तिने असं केलं तरी काय 

ब्रेकअपच्या चर्चांना सुष्मिताचं थेट उत्तर

मुंबई : महत्त्वपूर्ण आणि तितकेच दूरदृष्टीने घेतलेले निर्णय आणि वेळोवेळी मांडलेल्या ठाम भूमिका यांमुळे अभिनेत्री सुष्मिता सेन कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. त्यातच भर म्हणजे तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा. काही दिवसांपूर्वीच सुष्मिता आणि तिचा प्रियकर रोमन शॉल यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला होता. 

ब्रेकअपच्या या चर्चा रंगण्यास कारण होतं, ते म्हणजे रोमनच्या इन्स्टाग्रामवरील काही पोस्ट. ज्या नात्याविषयी सुष्मिताने मोठ्या विश्वासाने एका मुलाखतीत काही वक्तव्य केली होती, त्याच नात्यात दुरावा आल्या चर्चांमुळे चाहत्यांनाही धक्काच बसला. 

वयाने लहान असणाऱ्या आणि मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या रोमनसोबतच्या नात्यात सर्वकाही सुरळीत सुरु असताना या चर्चा उठल्याचं पाहता आता खुद्द सुष्मितानेच या साऱ्याला पूर्णविराम दिला आहे. 

fallbacks

इन्स्टाग्रामवर त्याच्यासोबतचा फोटो पोस्ट करत तिने अनोख्या अंदाजात रोमनवरील प्रेमाची कबुली दिली आहे. एका अर्थी तिच्या नात्यात दुरावा आला, असं म्हणणाऱ्यांना हे थेट उत्तरच आहे असं म्हणायला हरकत नाही. शिवाय रोमनची इन्स्टा स्टोरीही असंच काहीसं सांगून जात आहे. ज्यामध्ये त्याने, 'आपल्या हृदयाला त्याच्या घराची जागा मिळाली आहे आणि ती म्हणजे तू आहेस....' असं म्हणत सुष्मिताला या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. त्यामुळे या सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात सारंकाही सुरळीत आहे हेच आता स्पष्ट होत आहे. 

Read More