Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' बॉलिवूड अभिनेत्रीने पाळलाय साप!

साप म्हटलं की कोणालाही भीती वाटेल, अंगावर काटा येईल. 

'या' बॉलिवूड अभिनेत्रीने पाळलाय साप!

मुंबई : साप म्हटलं की कोणालाही भीती वाटेल, अंगावर काटा येईल. पण हिंदू परंपरेत सापाला देवता समजले जाते. त्याची नाग देवता म्हणून पूजा केली जाते. बॉलिवूडमध्ये देखील नाग-नागिणींवर अनेक सिनेमे आहेत आणि या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाईही केली आहे. पूजा, सिनेमे एकीकडे. पण घरात साप पाळण्याचे धाडस क्वचितच कोणी करेल. ही हिंमत बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने केली आहे.

कोण आहे ती?

या अभिनेत्रीचे नाव आहे सुष्मिता सेन. १९९४ मध्ये वर्ल्ड युनिव्हर्स ठरलेल्या सुष्मिता सेनने १९९६ मध्ये आलेल्या दस्तक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. १९९७ मध्ये बंगाली कुटुंबात जन्मलेली सुष्मिता सेनचे वडील इंडियन एअर फोर्समध्ये विंग कमांडर होते. तर आई सुभ्रा सेन ज्वेलरी डिजाईनर होती. त्यांचे दुबईत ज्वेलरी स्टोर होते. सुष्मिताला लहानपणापासूनच सरपडणाऱ्या प्राण्यांबद्दल विशेष प्रेम, आपुलकी होती. या प्रेमापोटीच सुष्मिताने घरात एक साप पाळला होता. घरात साप पाळणे ही काही सहज सोपी गोष्ट नाही. पण हे धाडस सुष्मिताने केले होते. यावरुन सुष्मिता फक्त सुंदर नाही तर बहादूरही आहे, हे स्पष्ट होते.

fallbacks

सापाला मानते देवता

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सुष्मिता शूटिंग करत असलेल्या सेटवर एक साप आला. यावेळी सर्वांची घारबगुंडी उडाली. मात्र सुष्मिता घाबरली नाही. ती त्या सापासमोर जावून बसली आणि जप करण्यास सुरुवात केली. सुष्मिता सापाला देवतेप्रमाणे पूजते. पण आता सुष्मिताच्या घरी साप आहे की नाही, याबद्दल काही माहिती मिळू शकली नाही.

लाईमलाईटपासून दूर पण सोशल मीडियावर अॅक्टीव्ह

सध्या लाईमलाईटपासून दूर असलेल्या सुष्मिता अविवाहीत असून तिने दोन मुलींचे पालकत्व स्विकारले आहे. रेने आणि अलिशा या दोन मुलींना तिने दत्तक घेतले आहे. या दोन मुलींसोबतचे फोटोज ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

fallbacks

Read More