Marathi News> मनोरंजन
Advertisement

तिला स्टायलिस्टची गरज... तापसी कोणाला सल्ला देतेय सल्ला?

एक भलताच सल्ला दिला आहे....

तिला स्टायलिस्टची गरज... तापसी कोणाला सल्ला देतेय सल्ला?

मुंबई : अभिनेत्री म्हणून काही साचेबद्ध भूमिकांचा स्वीकार न करता कायमच, काही आव्हानांचा स्वीकार करणारी अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची क्वीन कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्यासोबतच्या वादामुळे लक्ष वेधलेल्या या अभिनेत्रीने आता, एक भलताच सल्ला दिला आहे. 

एका कार्यक्रमात संवाद साधतेवेळी तापसीने हे वक्तव्यं केल्याचं म्हटलं जात आहे. बॉलिवूडमध्ये अशी कोणती अभिनेत्री आहे, जिला स्टायलिस्टची गरज आहे? असा प्रश्न तापसीला विचारण्यात आला. ज्यावर उत्तर देत तिने लगेचच उर्वशी रौतेला हिचं नाव घेतलं. 

इतक्यावरच न थांबता तिने पुढेही या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. देवाने तिला चांगलं शरीर दिलं आहे. त्यामुळे मी तिला चांगल्या पेहरावारात पाहू इच्छिते, असं म्हणत उर्वशी अंगप्रदर्शन करणारेच कपडे जास्त गालत असल्याची बाब तिने अधोरेखित केल्याचं म्हटलं जात आहे. 

fallbacks

उर्वशीला स्टायलिस्टची गरज आहे, असं म्हणणाऱ्या तापसीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. जिथे, काही नेटकऱ्यांनी तापसीचं समर्थन केलं तर, काहींनी उर्वशीची बाजू घेतली. मुख्य म्हणजे अद्यापही उर्वशीने यावर तिची प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता या अभिनेत्रींमध्ये वादाची ठिणगी पडणार, की उर्वशी यावर व्यक्त होणं टाळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

तापसीच्या हिंदी कलाविश्वातील कारकिर्दीविषयी म्हणावं तर, ती कायमच दिलखुलास अंदाजामुळे प्रकाशझोतात राहिली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली ओळख निर्माण केल्यानंतर बॉलिवूडमध्ये प्रवेश करत तापसीने या विश्वात तिचं वेगं स्थान निर्माण केलं. चित्रपटांची निवड आणि अभिनय या माध्यमातून कायमच तिचं वेगलळेपण सर्वांसमोर आलं. 

Read More