Marathi News> मनोरंजन
Advertisement

हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी बॉलिवूड अभिनेत्रीची लक्षवेधी प्रतिक्रिया

मनोरंजन जगताशी क्रीडा जगताचं असणारं नातं..... 

हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी बॉलिवूड अभिनेत्रीची लक्षवेधी प्रतिक्रिया

मुंबई : मनोरंजन जगताशी क्रीडा जगताचं असणारं नातं हे सर्वांच्याच माहिततलं आहे. या नात्याविषयी नव्याने काही सांगण्याची गरज नाही. सेलिब्रिटी आणि खेळाडूंच्या नात्यांच्या चर्चा यामध्ये अग्रस्थानी असतात. चर्चेत असणारी अशीच काही नावं म्हणजे अभिनेत्री, उर्वशी रौतेला आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्या.

हार्दिकचं नाव बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे उर्वशी. मागील वर्षी ती पांड्या बंधूंना एका पार्टीत भेटली होती. ज्यानंतर हार्दिकसोबतच्या तिच्या नात्याच्याच चर्चा रंगल्या. पण, आता मात्र या चर्चा आणि अफवांना कंटाळून उर्वशीने तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

एका युट्यूब व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर करत उर्वशीने प्रसारमाध्यमांना एक कळकळीची विनंती दिली आहे. प्रेमप्रकरणाविषयीचे असे व्हिडिओ प्रसिद्ध करणं थांबवण्याची विनंती तिने केली. आपण, या प्रकरणी कुटुंबाकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर देणं अपेक्षित आहे, असं म्हणत तिने ही विनंती केली. 

इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने ही पोस्ट शेअर केली. 'उर्वशी रौतेलाने एक्स बॉयफ्रेंड से माँगी मदद', अशा शीर्षकाच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर करत तिने या सर्व गोष्टी अडचणी निर्माण करत असल्याचं म्हटलं. 

fallbacks

आयबी टाईम्सच्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वीच उर्वशी हार्दिककडून लंडन येथे पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यासाठी दोन मोफत प्रवेशिका मिळवून देण्याची मागणी करत होती. उर्वशी स्वत: आणि तिच्या आईसाठी या प्रवेशिका मागत असल्याचं म्हटलं जात होतं. पण, हे सारंकाही खोटं असल्याचं म्हणत तिने या अफवा धुडकावल्या. आपल्याकडे कामास असणाऱ्या एका जुन्या मॅनेजरकडून हे सारंकाही सांगण्यात येत असल्याचं म्हणत एक क्लाईंट हातातून  निसटण्याचाच तो राग काढत असल्याची प्रतिक्रिया तिने दिली होती. 

Read More