Marathi News> मनोरंजन
Advertisement

पतीला सर्वांसमोर किस करणं अभिनेत्रीला पडलं महागात

तिच्या अदांनी सर्वजण घायाळ होत असले तरीही यावेळी मात्र....   

पतीला सर्वांसमोर किस करणं अभिनेत्रीला पडलं महागात

मुंबई : सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी अनेकदा चाहते सोशल मीडियाचा आधार घेतात. एक प्रकारे कलाकारांच्या जीवनात कुतूहलापोटी डोकावू पाहतात. परिणामी, ही कलाकार मंडळी त्यांच्या खासगी आयुष्याविषयीच्या अनेक गोष्टी गुलदस्त्यात ठेवतात. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री श्रिया सरन हिनेही असंच काहीसं केलं होतं. 

श्रियाने एका अत्यंत खासगी विवाहसोहळ्यात प्रियकर Andrei Koscheev याच्याशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर बऱ्याच काळाने तिने आपल्य़ा पतीला सर्वांसमोरही आणलं. रमेश तौरानी यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीच्या निमित्ताने श्रिया आणि तिच्या पतीचीही उपस्थिती पाहायला मिळाली. 

छायाचित्रकारांसमोर फोटोसाठी उभं राहिल्यानंतर त्याची ओळख करुन देण्याचं ती विसरून गेली. त्यानंतर लिफ्टपाशी गेल्यावर तिने पतीला किस केलं. मुख्य म्हणजे लिफ्टपाशी जाण्यापूर्वीही श्रियाने असंच काहीसं करत अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

fallbacks

दिवाळी पार्टीच्या निमित्ताने तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि कमेंट बॉक्यमध्ये नेटकऱ्यांनी श्रियावर निशाणा साधला. हे सर्वकाही तू लक्ष वेधण्यासाठी करत आहेस, असं म्हणत तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. इतकत नव्हे, तर पतीविषयी इतकी गोपनियता का पाळली असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला. थोडक्यात काय, तर पतीला किस करत सर्वांचं लक्ष वेधणं श्रियाला महागात पडलं असंच हा व्हिडिओ पाहून लक्षात येत आहे. 

 

Read More