Marathi News> मनोरंजन
Advertisement

Vicky- Katrina च्या लग्नातील अटींमुळे अभिनेता भडकला; पाहा काय म्हणाला....

अटी वाचून अभिनेता हैराण

Vicky- Katrina च्या लग्नातील अटींमुळे अभिनेता भडकला; पाहा काय म्हणाला....

मुंबई : बॉलिवूड वर्तुळात सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ या सेलिब्रिटी जोडीच्या लग्नाची. सूत्रांच्या माहितीनुसार कतरिना आणि विकी 9 डिसेंबर या दिवशी लग्नबंधनात अडकत एका नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत. 

असं म्हटलं जात आहे, की या जोडीकडून बऱ्याच कठोर अटी या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना घालण्यात आली आहे. 

विकी आणि कतरिनाच्या अटींची यादी पाहता, आता एका बॉलिवूड अभिनेत्यानं जाहीरपणे त्यांच्या लग्नाला आपण जाणार नसल्याचं म्हटलं आहे. 

हा पहिलाच असा अभिनेता असेल ज्यानं बी- टाऊनच्या या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्याला जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 

सोशल मीडियाच्याच आधारे या अभिनेत्यानं आपल्या मनातील गोष्ट सांगितली आणि त्याला फोटो व्हायरल झाला. मुख्य म्हणजे विकी,कतरिनापर्यंतही ही बाब पोहोचली असावी. 

सेलिब्रिटी लग्नासाठी न जाणारे हे अभिनेते आहेत गजराज राव. 

विकी आणि कतरिनाच्या लग्नात पाहुणे मंडळींना मोबाईल फोन नेण्यासही बंदी असे अशी अट समोर आली. शिवाय तिथं त्यांना फोटोही काढण्यास मनाई असेल असं सांगितलं गेलं. 

हीच बाब हेरत गजराज राव यांनी इन्स्टा स्टोरी शेअर करत सेल्फीही काढू देणार नाहीत... मी येणार नाही या लग्नाला असं म्हटलं. ज्यानंतर सर्वांचं लक्ष या पोस्टमध्ये वेधलं गेलं.

fallbacks

मुख्य म्हणजे आता तुम्ही म्हणाल की गजराज राव रागवले की काय, तर तसं नाही. थट्टा मस्करीतच राव यांनी ही पोस्ट शेअर केली आणि या वातावरणाला काहीसं वेगळं रुप दिलं. 

Read More