Marathi News> मनोरंजन
Advertisement

B'day Special: हे फोटो व्हायरल होताच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला रणबीर

रणबीरवर माध्यमांच्या कायमच नजरा... 

B'day Special: हे फोटो व्हायरल होताच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला रणबीर

मुंबई : 'सावरियाँ' या चित्रपटातून हिंदी कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या अभिनेता रणबीर कपूर याने पहिल्याच चित्रपटापासून त्याचा वेगळा चाहतावर्ग तयार केला होता. रणबीरच्या अभिनयाचे अनेक चाहते सुरुवातीच्या काळापासूनच त्याच्या पाठीशी उभे राहिल्याचे पाहायला मिळाले. त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत साकारलेल्या काही चित्रपटांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण, याकडेही त्याने कायमच सकारात्मकतेने पाहिलं. 

यशापशाची गणितं मांडत न बसता त्याने कायम एक कलाकार म्हणून प्रयोगशीलतेलाच महत्त्वं दिलं. असा हा अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होता. किंबहुना आताही आहे. प्रेमप्रकरणांपासून एका प्रति़ष्ठीत कुटुंबाशी त्याचं नाव जोडलं गेल्यामुळे हा 'बनी' कायमच प्रकाशझोतात असतो.  

रणबीरला प्रकाशझोतात आणण्यास आणखी एक निमित्त ठरलं होतं, ते म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेले त्याचे काही फोटो. त्यापैकी एक म्हणजे, कतरिनासोबतचा हा फोटो. कतरिनासोबत रिलेशनशिपमध्ये असतेवेळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या या सेलिब्रिटी जोडीचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोमुळे अनेक चर्चा झाल्या. शिवाय रणबीर आणि कतरिनाची खिल्लीही उडवली गेली होती. 

fallbacks

रणबीरवर खऱ्या अर्थाने कायमच माध्यमांच्या नजरा राहिल्या आहेत. त्याचा प्रत्यय आला तो म्हणजे पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यासोबतच्या त्याचा एक व्हायरल झालेला फोटो पाहून. परदेशात माहिरा आणि रणबीरची भेट झाली असतानाच ते दोघंही धुम्रपान करत असतानाचा हा फोटो. ज्यानंतर माहिरावर जोरदार टीका झाली. तर, रणबीरलाही अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. 

fallbacks

एकिकडे काही फोटोंनी रणबीरला अडचणीत आणलं, तर दुसरीकडे 'संजू' या चित्रपटाच्या निमित्ताने तयारीला लागलेल्या रणबीरचा हा फोटो चाहत्यांचं मन जिंकून गेला. संजय दत्तच्या भूमिकेत झळकलेल्या रणबीरने 'संजू'मधील भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतली होती. याच भूमिकेसाठी रणबीरला अनेक पुरस्कारही मिळाले. असा हा, बी- टाऊनचा 'सावरियाँ', 'बनी', 'चॉकलेट बॉय'.... येत्या काळातही तरुणींच्या मनावर राज्य करणात यात वाद नाही. 

Read More