Bollywood Box Office Queen: गेल्या दोन वर्षात तीन सिनेमांनी सर्वाधीक कमाई केली आहे. या तीन चित्रपटात एक गोष्ट समान आहे ती म्हणजे चित्रपटातील अभिनेत्री. या अभिनेत्रीने तीन वेगवेगळ्या प्रकारचे विषय असलेल्या सिनेमात काम केले आहे आणि बॉक्स ऑफिसवरही जादू केली आहे. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचे नाव आहे रश्मिका मंदाना. रश्मिकाने अॅनिमल, पुष्पा-2 आणि छावा या सिनेमात काम केलं आहे. हे चिन्ही चित्रपट ब्लॉकब्लास्टर ठरले आहेत.
रश्मिकाचा अॅनिमल, पुष्पा-2 आणि छावा तिन्ही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. दोन वर्षात रश्मिकाच्या चित्रपटांनी इतकी कमाई केली आहे की, आलिया आणि दीपिकाच्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.
रश्मिका मंदानाच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, पुष्पा 2 आणि अॅनिमलने वर्ल्डवाईड शानदार कमाई केली होती. तर, आता छावा सिनेमानेही 700 कोटींची कमाई केली आहे. या तिन्ही चित्रपटाने वर्ल्डवाईड ग्रॉस 3300 कोटींची कमाई केली आहे. भारतात तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दिली होती. अॅनिमलने 503 कोटींची कमाई केली होती. तर, पुष्पा 2 ने 812 कोटी तर छावाने 532 कोटींची कमाई केली होती.
रश्मिका ही मुळची साउथची हिरोइन आहे. कन्नड आणि तेलगु भाषांवर तिचे अधिक प्रभुत्व आहे. मात्र तरीही तिने आत्तापर्यंत अनेक हिंदी सिनेमे केले आहेत. रश्मिका मंदाना नॅशनल क्रश देखील आहे. त्यामुळं प्रेक्षकही तिला पसंती देत आहेत. प्रियंका चोप्रा परदेशात गेल्यानंतर दिपीका पदुकोण बॉक्स ऑफिसची क्वीन झाली होती. त्यानंतर आलिया भट्टचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर गाजले होते. आता आलिया आणि दीपिकाला मागे टाकत रश्मिका बॉक्स ऑफिसची क्वीन ठरली आहे. रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, रश्मिका मंदानाजवळ अनेक प्रोजेक्ट आहेत. सिकंदर हा सिनेमा ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्या व्यतिरिक्त आयुष्मान खुराना थामा या सिनेमातही दिसणार आहे.