Bollywood Celebrities on Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याच्या काही दिवसांनंतर, भारतीय लष्कराने बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ लक्ष्यित गटांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हवाई हल्ल्यासह भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने हा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या सर्जिकल स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आहे. या ऑपरेशनचं बॉलिवूडकरांनी भरभरून कौतुक केलं आहे. या संधर्भात भारतीय लष्कराने ट्विटरवर पोस्ट करत लिहलं की , "न्याय झाला आहे. जय हिंद!" आता या 'ऑपरेशन सिंदूर'वर बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे.
अभिनेता रितेश देशमुख, निमरत कौर आणि चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांच्यासह बॉलिवूड सेलिब्रिटींनी भारताच्या दहशतवादी हल्ल्याबद्दल खूप अभिमानास्पद प्रतिक्रिया व्यक्त केल्या. "जय हिंद की सेना...भारत माता की जय!!! #OperationSindoor," असे रितेश देशमुखने लिहिले.
Jai Hind Ki Sena … भारत माता की जय !!!! #OperationSindoor pic.twitter.com/OtjxdLJskC
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 6, 2025
यावर बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भांडारकरने पोस्ट केले की, "आमच्या प्रार्थना आमच्या सैन्यासोबत आहेत. एक राष्ट्र, आम्ही एकत्र उभे आहोत. जय हिंद, वंदे मातरम."
Our prayers are with our forces. One nation, together we stand. Jai Hind, Vande Mataram. pic.twitter.com/IyiOX8hqma
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) May 6, 2025
भारतीय सशस्त्र दलांचे कौतुक करत, अभिनेत्री निमरत कौरने लिहिले, "आपल्या सैन्यासोबत एकजूट. एक राष्ट्र. एक ध्येय. #जयहिंद #ऑपरेशनसिंदूर."
याशिवाय, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स-अकाउंटवरून एक गूढ पोस्ट केली आहे. पोस्टद्वारे ते काय म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे हे सांगणे कठीण आहे. पण पहलगाम हल्ल्यादरम्यानही त्यांनी अशीच पोस्ट केली होती. त्यामुळे असे म्हणता येईल की या पोस्टचा ऑपरेशन सिंदूरशी काही संबंध असू शकतो.
भारत माता की जय! #OperationSindoor
— Anupam Kher (@AnupamPKher) May 7, 2025
टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यने लिहिले की, 'धर्माबद्दल विचारन गोळी मारली , आता त्याची मोठी किंमत मोजा. भारताच्या आत्म्यावर हल्ला केलात, आता तुम्ही मातीत मिसळाल. मातीमोल होशील. जय हिंद. भारताचा विजय. जय हिंद सेना.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाने बुधवारी (७ मे) पहाटे कारवाई केली. यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत हे हल्ले करण्यात आले.