Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aryan khan NCB Arrest : आर्यन खाननंतर 'या' सेलिब्रिटींच्या मुलांचे पार्टीतील 'ते' फोटो व्हायरल

आर्यन खानवर कारवाई होताच इतर सेलिब्रिटी पार्टींमधील स्टारकिड्सचे फोटो व्हायरल 

Aryan khan NCB Arrest : आर्यन खाननंतर 'या' सेलिब्रिटींच्या मुलांचे पार्टीतील 'ते' फोटो व्हायरल

मुंबई : अभिनेता शाहरुख खान, याच्या मुलाला म्हणजेच आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबीनं ताब्यात घेतलं आणि किंग खानचं नाव या कारणामुळं प्रकाशझोतात आलं. आर्यन खानची एनसीबीकडून चौकशीही करण्यात आणि अनेक चर्चांना उधाण आलं. यातीलच एक चर्चा होती ती म्हणजे स्टारकिड्सच्या पार्टीची. 

शाहरुखची मुलं असो किंवा मग इतर सेलिब्रिटींची. स्टारकिड्सच्या या पार्टी आणि तिथं सुरु असणारे सर्व प्रकार, या पार्टीच्या थीम सातत्यानं सर्वाचं लक्ष वेधत असतात. या पार्टीमध्ये या मुलांच्या आऊटफीटपासून प्री आणि पोस्ट पार्टीचे फोटोही अनेकांच्याच भुवया ऊंचावतात. 

fallbacks

fallbacks

fallbacks

fallbacks

fallbacks

हाय प्रोफाईल पार्टीमध्ये असनेदका ही सेलिब्रिटींची मुलं सहभागी होतात. कित्येकदा या पार्टींमध्ये बरेच चुकीचे प्रकारही घडतात. त्यातच सध्या एनसीबी सक्रिय झाली असून, अशा हाय प्रोफाईल पार्टींमध्ये नेमकं काय सुरु आहे, यावर या पथकांची करडी नजर असून, प्रत्येक अनुचित प्रकारावर कारवाई केली जात आहे. 

 

दरम्यान आर्यन खानवर कारवाई होताच इतर सेलिब्रिटी पार्टींमधील स्टारकिड्सचे फोटो व्हायरल झाले. यामध्ये सुहाना खानच्या न्यूयॉर्कमधील पार्टीचा एक फोटो व्हायरल झाला. तर, अनन्या पांडेनंही शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं. बिग बींची नात, नव्य नवेलीनंही काही दिवसांपूर्वी केलेली पार्टी आणि तिचा अंदाज अनके प्रश्नांना वाव देऊन गेला. 

Read More