Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉलिवूडच्या या '6' सेलिब्रिटींकडे स्वतःची प्रायव्हेट जेट

बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणजे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही ग्लॅमर खूप असते.

बॉलिवूडच्या या '6' सेलिब्रिटींकडे स्वतःची प्रायव्हेट जेट

 मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणजे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही ग्लॅमर खूप असते.

अनेक कलाकारांची तुम्ही भव्य घरं, आलिशान गाड्या बघितल्या असतील पण बॉलिवूड कलाकार प्रवासादरम्यान स्वतःच्या जेट प्लेनने प्रवास करतात. बॉलिवूडच्या या सहा सेलिब्रिटीकडें स्वतःची जेट प्लेन्स आहेत. मग पहा कोणा आहेत हे बॉलिवूडचे सितारे ...  

 
 शाहरूख खान   

 बॉलिवूडचा किंग खान किताब मिरवणारा शाहरूख, अनेकदा चित्रपटांच्या प्रमोशनसाठी, फॅमिलीसोबत फिरताना, शूटिंगसाठी स्वतःच्या जेट प्लेनने फिरतो.   

fallbacks

 अमिताभ बच्चन  

 बीग बी वयाच्या 75 मध्येही कामामध्ये व्यस्त असतात. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान फिरताना ते जेट प्लेनचा वापर करतात. परिवारासोबत फिरताना ते याचा हमखास वापर करतात. 

fallbacks

 

 अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन  

 अमिताभ बच्चनप्रमाणे अभिषेक आणि ऐश्वर्याचे स्वतंत्र जेट प्लेन आहे. लग्नानंतर अभिषेक आणि ऐश्वर्यायामधून फिरताना दिसले होते. 

fallbacks

 

 अक्षय कुमार  

 बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार फीटनेस फ्रीक आहे. त्याच्या दिमाखदार घराचे फोटो अनेकांनी पाहिले आहेत. पण घराइतकेच त्याचे जेट प्लेनदेखील खास आहे.   

fallbacks

 

 शिल्पा शेट्टी 

 शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याकडे स्वतःचे जेट प्लेन आहे. शिल्पा चित्रपटामध्ये दिसत नसली तरीही देशात फिरताना, कार्यक्रमासाठी आणि व्हेकेशनदरम्यान जेट प्लेनचा वापर करते. 

fallbacks

 
 प्रियांका चोप्रा   

 अभिनेत्री प्रियांका चोप्राकडेदेखील स्वतःचे जेट प्लेन आहे. सध्या प्रियांका हॉलिवूडमध्ये आहे. मात्र भारतात फिरण्यासाठी तिने नुकतेच प्रायव्हेट जेट विकत घेतले आहे.  

fallbacks

Read More