Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉलिवूड सेलिब्रिटी अन् क्रिकेटपटू हेअर कट करण्यासाठी किती लाख खर्च करतात? त्याच आलिम हकीमवर अभिषेकनं झाडली होती गोळी...

Bollywood Celebrities to Cricketers Alim Hakim : आलिम हकीम हेअर कट करण्यासाठी किती पैसे घेतो? 

बॉलिवूड सेलिब्रिटी अन् क्रिकेटपटू हेअर कट करण्यासाठी किती लाख खर्च करतात? त्याच आलिम हकीमवर अभिषेकनं झाडली होती गोळी...

Bollywood Celebrities to Cricketers Alim Hakim : बॉलिवूड म्हटलं की त्याच्यासोबत येतं लग्झरीयस लाइफस्टाइल. सेलिब्रिटींचं स्टायलिश दिसणं या सगळ्या गोष्टी नेहमीच आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधताना दिसतात. त्यात सुंदर दिसण्यासाठी ते विविध गोष्टी ट्राय करताना दिसतात. त्यात सगळ्यात जास्त चर्चा ही असते ती त्यांच्या स्टाइल आणि हेअर स्टाईलची. प्रत्येकवेळी अभिनेत्री तर वेगळी हेअर स्टाईल करताना दिसतात. तर अभिनेते हे नेहमीच चित्रपटासाठी वेगवेगळे लूक करतात. हे सगळे सेलिब्रिटी हेअरकट करण्यासाठी देखील लाखो रुपये खर्च करतात. आता सगळ्यांनाच माहित आहे की सगळेच सेलिब्रिटी हे हेअरकट करण्यासाठी आलिम हकीमकडेच जातात. चला तर जाणून घेऊया ते नक्की एका हेअरकटसाठी ते किती पैसे खर्च करतात. 

बॉलिवूडमधील लोकप्रिय हेअरस्टायलिस्टमध्ये आलिम हकीम ज्यांच्याकडे सेलिब्रिटी हे डिफरंट आणि स्टायलिश हेअरकट करायला जातात. जर तुम्ही रणबीर कपूरच्या ‘एनिमल’ किंवा ‘संजू’ या चित्रपटांमधील हेअरकट किंवा विराट कोहलीनं आयकॉनिक फेड कट कुठून केला असा प्रश्न पडला असेल तर त्यानं तो आलिम हकीमकडून केले आहेत. त्यासाठी त्यांनी किती रक्कम मोजली याविषयी जाणून घेऊया. 

हेअरकट पासून फक्त 15 मिनिटांच्या अपॉइंटमेंटसाठी घेतो इतकी फी...

आलिम हकीमनं ब्रूट इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की त्यानं हेअरकट केला तर त्याची सुरुवात ही 1 लाख रुपयांपासून होतो. त्यासोबत 18000 रुपये GST हा वेगळा लागतो. खास स्टायलिंग करायची असल्यास किंवा कोणत्या मूव्हीसाठी स्टाइल करायचं असल्यास तो 3 ते 5 लाख रुपये पैसे आकारतो.  आलिम हकीम इतका व्यग्र असतो की स्टाइल सजेस्ट करण्यासाठी देखील पैसे आकारतो. 15 मिनिटं जर तो तुमच्याशी बोलत असेल तर किंवा त्याची अपॉइंटमेंट घेतली तर तुम्हाला त्यासाठी देखील मानधन द्यावं लागेल. त्यासाठी तो किती फीस घेतो याविषयी काहीही खुलासा केलेला नाही. 

पुरुष आणि महिलांसाठी काय आहे पैशांची रेंज

मुंबईत असलेल्या Hakim’s Aalim Hair n’ Beauty Lounge मध्ये नॉर्मल हेअरकट करण्यासाठी पुरुषांसाठी ही 4000 रुपये आहे तर महिलांसाठी 5000 रुपये आहे.आलिमनं रणबीरसाठी आयकॉनिक लूक्स बनवले आहेत. त्याच्या ‘संजू’ आणि ‘एनिमल’ या चित्रपटांसाठी त्यांनी 6 महिन्यांपर्यंत रिसर्च आणि स्टायलिंग केली होती. 

हेही वाचा : अनुष्कासोबत विराटच्या बहिणीचं नातं कसं आहे? ट्रोल होताच म्हणाली...

आलिम हकीमनं स्वत: एका मुलाखतीत खुलासा केला होता की अभिषेक बच्चननं त्याच्या पायावर गोळी झाडली होती. दस या चित्रपटाची शूटिंग करत असताना कॅनाडामध्ये जेव्हा आलिम शूटिंग सेटवर सगळ्यांचे हेअर स्टाईल करत होता. काही कारणांमुळे अनुभव सिन्हा यांचे असिस्टंट आजारी होते त्यावेळी त्यांनी मला त्यांच्या असिस्टंटच्या रिप्लेसमेंट म्हणून ठेवलं होतं. मी सतत कोणाचे ना कोणाचे हेअर स्टाइल करायचो आणि शूटिंगवर देखील लक्ष ठेवायचो. अभिषेकनं मला सांगितलं की 'जर मी माझी ही कन्टिन्यूट मिस केली तर तो माझ्यावर गोळी झाडेल. तर तसंच झालं. त्यानं प्रॉप गननं माझ्या पायावर गोळी झाडली. त्यामुळे मला खूप त्रास झाला आणि चालायचा देखील त्रास होऊ लागला.'  

Read More