Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनेक रिलेशनशिप... बक्कळ पैसा तरीही एकटं आयुष्य जगतात हे स्टारकिड्स

प्रसिद्धी, पैसा सगळं काही असूनही हे स्टारकिड्स जगतात एकटं आयुष्य...   

अनेक रिलेशनशिप... बक्कळ पैसा तरीही एकटं आयुष्य जगतात हे स्टारकिड्स

मुंबई : आयुष्यात आपल्यासोबत एक व्यक्ती कायम असावा अशी इच्छा प्रत्येकाची असते. पण असे काही स्टारकिड्स आहेत, अनेक रिलेशनशिप.... बक्कळ पैसा असूनही एकटं आयुष्य जगतात. अभिनेता अक्षय खन्ना, सलमान खान, तुषार कपूर, एकता कपूर... यांच्याकडे प्रसिद्धी आणि पैसा सर्व काही आहे. पण जोडीदार नाही.. अशाचं काही स्टारकिड्सबद्दल आज जाणून घवू... 

अभिनेता अक्षय खन्ना
अनेक अभिनेत्रींसोबत अक्षयचं नाव देखील जुळलं. दरम्यान, कपूर कुटुंबाकडून अक्षयला लग्नाची मागणी घालण्यात आली.रणधीर कपूर यांना त्यांची मुलगी करिश्मा कपूरचं लग्न अक्षयसोबत करायचे होतं, म्हणून त्यांनी अक्षयचे वडील विनोद खन्ना यांच्या घरी अक्षय आणि करिष्माच्या लग्नाची मागणी घातली. पण करिष्माची आई बबीता यांनी दोघांचं लग्न मान्य नव्हतं. 

अभिनेता सलमान खान
सलमान खानचं नाव देखील अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत लग्न ठरलं. पण आयत्या वेळी दोघांनी लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर सलमानचं नाव अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि कटरिना कैफसोबत देखील जोडण्यात आलं. 

तुषार कपूर
तुषारला लग्न करायचं नाही. त्याने सरोगसीच्या माध्यमातून कुटुंब सुरू केलं आहे. 45 वर्षांच्या तुषारला एक मुलगा आहे. त्याचं नाव लक्ष्य कपूर आहे.

एकता कपूर
टीव्ही क्विन एकता कपूर देखील एकटं आयुष्य जगते. एका मुलाखतीत तिने लग्न न करण्याचं कारण सांगितलं. एकताने 2019 रोजी सरोगेसीच्या माध्यमातून एका मुलाला जन्म दिला. एकताच्या मुलाचं नाव रवी आहे. 

तनीषा मुखर्जी
अभिनेत्री तनीषा मुखर्जी आजही एकटं आयुष्य जगते. वयाच्या 44 व्या वर्षी देखील तिने लग्न केलेलं नाही. तनीषाचं नाव अभिनेता अरमान कोहलीसोबत जोडण्यात आलं होंत. 

Read More