Marathi News> मनोरंजन
Advertisement

यांच्या Income Tax इतका आमचा वर्षभराचा पगारही नाही, सेलिब्रिटींच्या कराचा आकडा पाहून हादराल

दक्षिण मुंबईत आलिशान घर घेता येईल, इतका मोठा आकडा...   

यांच्या Income Tax इतका आमचा वर्षभराचा पगारही नाही, सेलिब्रिटींच्या कराचा आकडा पाहून हादराल

मुंबई : Income Tax भरण्याची वेळ जेव्हा जेव्हा येते, तेव्हा प्रत्येक वेळी अरे हे कसं करायचं, किती हा व्याप अशाच प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात. इथे तुम्ही आम्ही सर्वणज आयकर परताव्याच्या गोंधळात गुरफटलेलो असतानाच तिथे सेलिब्रिटी मंडळींकडून मात्र मोठ्या प्रमाणात अगदी न चुकता  Income Tax भरला जातो. (Bollywood Celebs salman khan amitabh bachchan shahrukh khan Income Tax)

सेलिब्रिटींची एकंदर कमाई पाहता त्यांना आयकर विभागाकडे जाणारा कराचा आकडा डोळे विस्फारायला भाग पाडणारा आहे. यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे अभिनेते अमिताभ बच्चन यांचं. 2018- 19 या वर्षासाठी त्यांनी तब्बल 70 कोटी रुपये इतका  Income Tax भरला होता. 

fallbacks

सलमान खानही त्याच्या कमाईपैकी जवळपास 44 कोटी रुपये इतका कर भरतो. दमदार चित्रपट आणि जाहिरातींच्या बळावर सलमान करत असणाऱ्या कमाईचा आकडा पाहून धक्का बसला ना? 

fallbacks

करदात्या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेता शाहरुख खान याच्याही नावाचा समावेश आहे. तो आपल्या एकूण उत्पनापैकी 22 कोटी रुपये इतका कर भरतो. चित्रपटांसोबतच शाहरुखची इतर क्षेत्रांमध्येही गुंतवणूक आहे, ज्यामुळं त्याच्या उत्पन्नाचा आकडा तगडा आहे. 

fallbacks

करदात्या सेलिब्रिटींच्या या यादीतून अभिनेता अक्षय कुमार याचं नाव डावलणं अशक्य. अक्षयनं यंदाच्या वर्षीसुद्धा योग्य वेळी  Income Tax देत आपली जबाबदारी पार पाडली. यंदा तो सर्वाधिक कर देणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी असल्यामुळं केंद्राकडून त्याला एक प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे. साधारण 30 कोटींच्या घरात त्यानं कर दिल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

fallbacks

Read More