Marathi News> मनोरंजन
Advertisement

कमी वयातच लग्न करत पत्नीला घटस्फोट देणं हृतिकला महागात; पोटगीची रक्कम हादरवणारी

पहिल्या चित्रपटानंतरच... 

कमी वयातच लग्न करत पत्नीला घटस्फोट देणं हृतिकला महागात; पोटगीची रक्कम हादरवणारी

मुंबई : बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून नावाजलेल्या अभिनेता हृतिक रोशन यानं 2000 या वर्षी  हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं.  'कहो ना प्यार है' हा त्याचा पहिलावहिला चित्रपट. 21 वर्षांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत हृतिकनं अनेक चढउतार पाहत आपल्या जीवनाला दिशा दिली. (Hritik Roshan)

फिमेल फॅन्समध्ये हृतिकची लोकप्रियता वाखाणण्याजोगी आहे. कलाविश्वाशी नातं असणाऱ्या एका कुटुंबात त्याचा जन्म झाला. 

हृतिकचं पूर्ण नाव, हृतिक राकेश नागरथ असं आहे. राकेश रोनन हे त्याचे वडिल निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. तर, लोकप्रिय संगीतकार रोशनलाल नागरथ हे त्याचे आजोबा. 

हृतिकची आई, पिंकी रोशन ही निर्माते- दिग्दर्शक ओम प्रकाश यांची मुलगी. 

हृतिकनं सुरुवातीच्या काळात काही चित्रपटांसाठी आपल्या वडिलांच्या हाताखाली शिकत सहायक दिग्दर्शकाची भूमिकाही बजावली. 

बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पणानंतरच त्यानं संजय खान यांची मुलगी सुझान खान हिच्याशी लग्न केलं. पण, त्यांच्या या नात्याला काही वर्षांनी तडा गेला. 

सूत्रांच्या माहितीनुसार घटस्फोटाचा निर्णय हृतिकला शब्दश: महाग पडला. 

पोटगी म्हणून त्यानं सुझानला एकदोन नव्हे, तब्बल 380 कोटी रुपये इतरी तगडी रक्कम दिली. 

जगात आतापर्यंत झालेल्या महागड्या घटस्फोटांमध्ये हृतिक आणि सुझानच्याही घटस्फोटाचा उल्लेख केला जातो. 

हृतिक आणि सुझानच्या वाटा वेगळ्या झाल्या असल्या, तरीही त्यांच्यामध्ये असणारी मैत्री आजही कायम आहे. 

मुलांसाठी आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं सुझान आणि हृतिक कायमच एकत्र दिसतात. यावेळी त्यांच्यामध्ये कोणत्याची प्रकारता अबोला किंवा तत्सम परिस्थिती दिसत नाही. 

Read More