Marathi News> मनोरंजन
Advertisement

Video : अभिनेत्री होण्यासाठी जॉनी लिवर यांच्या मुलीनं पसरले हात आणि पुढे.....

तिनं नेमकं काय केलं ? 

Video : अभिनेत्री होण्यासाठी जॉनी लिवर यांच्या मुलीनं पसरले हात आणि पुढे.....

मुंबई : हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या विनोदी शैलीच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता जॉनी लिवर (Johny Lever) यांच्यासाठी आजही चाहत्यांच्या वर्तुळात खास स्थान आहे. त्यांच्याप्रमाणच मुलगी जेमी लिवर (Jamie Lever) हीसुद्धा तिच्या कौशल्याच्या बळावर चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. 

जेमीचा व्हिडीओ व्हायरल
जेमी लिवर ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करणाऱ्या याच जेमीनं आता म्हणजे अभिनेत्रींप्रमाणं एक शूट करुन घेण्यासाठी कोणापुढेतरी हात पसरले. तिनं याचना केल्यानंतर अखेर ते शूट पूर्ण पडलं, ज्याचा व्हिडीओ जेमीनं शेअर केला. 

आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची नक्कल करणाऱ्या जेमीनं यावेळी 90 च्या दशकाती चित्रपट आणि त्यामधील अभिनेत्रींची नक्कल केली आहे. यासाठी तिनं स्वत:चं स्विमिंग पूलमधील व्हिडीओ शूट शेअर करत यासाठी भावंडांकडे हात पसरल्याचं सांगितलं. 'लहानपणापासूनच माझं स्वप्न होतं, की असं शूट करुन घ्यावं. तर मग शेवटी भावंडांकडे याचना केली आणि शूट केलं....' असं तिनं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. 

जेमीचा हा अंदाज आणि तिचा हा व्हिडीओ फॉलोअर्सच्या चांगलाच पसंतीस पडला. ज्यानंतर त्यावर अनेकांनीच कमेंट करण्यास सुरुवात केली. जॉनी लिवर यांच्या लेकिचा व्हिडीओ पाहून तुम्ही काय म्हणाल? 

Read More