Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ahmm Ahmm! कतरिना कैफनं 'सुहागरात'विषयी केलेल्या वक्तव्यानंतर विकी कौशलही लाजेल

ती असं काही म्हणाली की, समोरचेही पाहतच राहिले

Ahmm Ahmm! कतरिना कैफनं 'सुहागरात'विषयी केलेल्या वक्तव्यानंतर  विकी कौशलही लाजेल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री (Katrina Kaif) कतरिना कैफ हिनं अभिनेता विकी कौशल (Vidky Kaushal) याच्याशी लग्नगाठ बांधल्या क्षणापासून ती आगामी चित्रपटांपेक्षा या नात्यामुळंच सर्वाधिक चर्चेत येताना दिसत आहे. कतरिना आणि विकीचं पाहून बऱ्याचजणांना त्याचा हेवाही वाटतो. 

अशा या नात्याबाबत आणि आपल्या काही Fantasy बद्दल कतरिनानं नुकतंच Koffee With Karan Season 7 मध्ये नजरा वळवणारं वक्तव्य केलं. निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या टॉक शोमध्ये नुकतीच कतरिनानं अभिनेता इशान खट्टर (Ishaan Khattar) आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत हजेरी लावली होती. 

कतरिनानं या कार्यक्रमासाठी ग्लॅमरस लूकला पसंती दिली होती. तर, तिच्यासोबतचे दोन्ही अभिनेते Cool Dude लूकमध्ये सर्वांसमोर आले होत. यावेळी त्या तिघांनीही बऱ्याच खासगी प्रश्नांचीही उत्तरं दिली. 

एकिकडे बॉलिवूडमध्ये लोकप्रिय सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत असतनाच दुसरीकडे आलिया भट्टनं मात्र 'सुहागरात' या संकल्पनेलाच नकार दिला होता. लग्नानंतर लगेचच सुहागरात वगैरे काही होत नसतं, अशा आशयाचं वक्तव्य आलियानं केलं होतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

तिच्या या वक्तव्यावर कतरिनानं प्रतिक्रिया देत स्वत:चा वेगळा विचार मांडला. 'दरवेळी सुहागरातच का हवी? सुहाग दिनसुद्धा असू शकतो की... ' असं ती म्हणाली. एकिकडे विवाहित जोडप्यांना लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची (Suhagraat) उत्सुकता असतानाच कतरिनानं मात्र ती संकल्पनाच बदलली. 

हे ऐकून तिथं असणाऱ्या सिद्धांत आणि इशानही थक्कच झाले. आता मुद्दा असा, की कतरिनाचं हे वक्तव्य ऐकून तिचा पती, अभिनेता विकी कौशल यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार.... ?  

Read More