Marathi News> मनोरंजन
Advertisement

Pathaan साठी Shah Rukh ला 1 अब्ज आणि दीपिकाला 'इतक्या' रुपयांचं मानधन

Pathaan चित्रपटासाठी Shah Rukh आणि Deepika Padukone घेतलेली फी पाहून तुमची तहानभूक हरवेल

Pathaan साठी Shah Rukh ला 1 अब्ज आणि दीपिकाला 'इतक्या' रुपयांचं मानधन

Pathaan Cast Fee Revealed : शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) पठाण (Pathaan) हा चित्रपटाचा टिझर सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. पठाण चित्रपटाचे पहिले गाणे "बेशरम रंग" हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. या गाण्यातील दीपिकाच्या ऑऊटफिटवर टिका केली जात आहे. पठाण चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील बायकॉट पठाणचा ट्रेंड(Boycott Pathaan trends) पहायला मिळत आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका पदुकोणशिवाय आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.


शाहरुख आणि जॉनची फी...

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान तब्बल ४ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'बेशरम रंग' या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे, ज्यामध्ये शाहरुखच्या अॅब्स (Abs) आणि दीपिकाच्या बिकिनी लूकवर (Bikni Look) चाहते घायाळ झाले आहेत. दोन्ही स्टार्सची फिटनेस (Fitness) पाहता दोघांनीही या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्यांनी चित्रपटासाठी घेतलेली मेहनत दिसत आहे. त्यांच्या या मेहनतीमुळे योग्य मोबदला ही मिळाला आहे. या चित्रपटातील स्टार्सच्या फीबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.  चला तर मग जाणून घेऊया कोणत्या स्टारने 'पठाण'साठी किती पैसे घेतले.


शाहरुख खानबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटासाठी अभिनेत्याने स्वतःवर खूप मेहनत घेतली आहे. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, तो बर्याच काळापासून विशेष आहार घेत आहे आणि तीव्र व्यायाम करत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा मेहनत दुप्पट होते तेव्हा पैसेही दुप्पट व्हायला हवेत. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने 100 कोटी रुपये घेतले आहेत.


तर दुसरीकडे बॉलिवूडची लेडी स्टार म्हटल्या जाणार्‍या दीपिका पदुकोणने 15 कोटी रुपये घेतले आहेत. या चित्रपटात जॉन अब्राहमचीही महत्त्वाची भूमिका आहे, या प्रकरणात अभिनेत्याला 20 कोटी रुपये मिळाले आहेत.

Read More