Marathi News> मनोरंजन
Advertisement

शाहरुख खानला गंभीर दुखापत; अभिनेता उपचारासाठी अमेरिकेला रवाना, 30 दिवसांसाठी...

Shah Rukh Khan got Injured : किंग खानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी. अभिनेत्याला उपचारांसाठी अमेरिकेला पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती... चित्रपटाच्या सेटवर जे काही घडलं ते चिंता वाढवणारं...   

शाहरुख खानला गंभीर दुखापत; अभिनेता उपचारासाठी अमेरिकेला रवाना, 30 दिवसांसाठी...

Shah Rukh Khan got Injured : हिंदी कलाजगतामध्ये कैक वर्षांपासून अधिराज्य गाजवणारा अभिनेता शाहरुख खान मागील काही दिवसांपासून त्याच्या आगामी 'किंग' या चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असतानाच एका साहसी दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली. ही दुखापत मांसपेशींशी संबंधित असल्याच कारणानं अभिनेत्याला दीर्घकाळ आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Filmfare (@filmfare)

माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार शाहरुख खान सध्या त्याच्या टीमसह उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. तिथं डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याला साधारण 30 दिवस म्हणजेच महिनाभर आराम करण्याचा सल्लाही दिला आहे. चित्रपटातील साहसदृश्य चित्रीत करताना यापूर्वीसुद्धा शाहरुखला मांसपेशींसंदर्भातील दुखापती झाल्या होत्या. त्यामुळ त्या दुखापतींतून सावरणारा किंग खान आतासुद्धा या आव्हानात्मक काळातून बाहेर येईल असाच चाहत्यांना विश्वास आहे. 

प्रकृती पूर्णपणे सुधारल्यानंतर शाहरुखच्या 'किंग' या चित्रपटाचं पुढील चित्रीकरण सुरू होईल अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. ज्यामुळं या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण महिन्याभरासाठी थांबवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 

निर्धारित तारखांनुसार जुलै ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान शाहरुखच्या या चित्रपटाचं चित्रीकरण होणं होतं. मात्र आता अभिनेत्याला झालेली दुखापत पाहता तो यातून सावरल्यानंतरच चित्रीकरण पुन्हा सुरू होईल असं सांगण्यात येत आहे. शाहरुखच्या या चित्रपटाचं चित्रीकरण फक्त मुंबईतच नव्हे, तर युरोपच्या विविध भागांमध्ये पार पडणार आहे. ज्यामुळं आता चित्रपटाची संपूर्ण टीम शाहरुखची प्रकृती आणि चित्रीकरणाच्या आगामी तारखांच्या प्रतीक्षेत आहे. 

चित्रपट जगताशी संबंधित जाणकारांच्या माहितीनुसार शाहरुख सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. शाहरुखची दुखापत तोपर्यंत पूर्णपणे बरी होईल अशा आशेवरच हा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं एकिकडे चाहते चिंतेत असताना त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी किंवा त्यासंदर्भातील सकारात्मक वृत्त समोर यावं याचीच अनेकांना प्रतीक्षा आहे.

Read More