Marathi News> मनोरंजन
Advertisement

रक्ताचा शेवटचा थेंबही देशासाठीच; भारताच्या 120 जवानांपुढे 3000 चिनी जवान ठाकताच पेटला संघर्ष...

India China War : युद्धभूमीवर नेमकी काय परिस्थिती? थरारक व्हिडीओ समोर. रक्त गोठवणाऱ्या थंडीत देशाच्या सीमेवर घडलेला एक चित्तथरारक प्रसंग पहिल्यांदाच समोर...   

रक्ताचा शेवटचा थेंबही देशासाठीच; भारताच्या 120 जवानांपुढे 3000 चिनी जवान ठाकताच पेटला संघर्ष...

India China War : भारत आणि चीन यांच्यामध्ये असणारा सीमावाद कायमच विविध कारणांनी धुमसत असून, या वादाला कैक वर्षांचा इतिहास आहे. सीमाभागातील हा तणाव मागच्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांच्या लष्करांमधील तणावात भर टाकत असून, त्याची सुरुवात नेमकी कुठं झाली आणि भारतीय लष्कराच्या सेवेत असणाऱ्या जवानांनी जवळपास अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतसुद्धा चीनच्या लष्करी हल्ल्याला नेमकं कसं आणि किती साहसानं प्रत्युत्तर दिलं याची झलक पहिल्यांदाच समोर आली आहे. 

कोणत्या युद्धाची झलक पाहून थरकाप उडतोय? 

'120 बहादूर' नावानं या युद्धप्रसंगाचा व्हिडीओ समोर आला असून पुन्हा एकदा इतिहासात डोकावण्याची संधी मिळत आहे ती म्हणजे अभिनेता फरहान अख्तर याच्या आगामी चित्रपटामुळं. (120 Bahadur Teaser) 

(Leh Ladakh) लडाखमधील रेझांग ला (rezang la) इथं 1962 मध्ये भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये मोठं युद्ध झालं आणि या युद्धाज हजारोंच्या संख्येनं उभ्या ठाकलेल्या चिनी सैनिकांपुढं भारतीय लष्कराच्या 120 जवानांच्या तुकडीनं नेमका कसा लढा दिला ही शौर्यगाथा या चित्रपटात साकारण्यात आली आहे. 

अखेरच्या श्वासापर्यंत लढा... 
लडाखच्या अतिप्रचंड आव्हानात्मर पर्यावरणाशी झुंज देत चीनच्या 3000 सैनिकांशी Indian Army च्या 120 जवानांनी मेजर शैतान सिंह भाटी यांच्या नेतृत्त्वाखाली रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा दिला. अखेरच्या श्वासापर्यंत हे सैनिक लढले आणि देशाच्या रक्षणासाठी त्यांनी कर्तव्यावर तत्पर राहणं पसंत केलं. 

लडाखच्या सीमाभागात या अद्वितीय साहसी कामगिरीसाठी मेजर शैतान सिंह भाटी यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा सर्वोच्च सैन्य पुरस्कार देण्यात आला आणि हीच गाथा अभिनेता फरहान अख्तर याच्या मध्यवर्ती भूमिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज होत आहे. 

राश‍ि खन्ना, एजाज़ खान, देवेंद्र अहिरवार, स्पर्श वालिया आणि मुख्य भूमिकेत फरहान अख्तर या कलाकारांची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट 21 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, 'लक्ष्य'च्याच टीमक़डून हा चित्रपट साकारला जात असल्या कारणानं प्रेक्षकांमध्येसुद्धा या चित्रपटाविषयीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

अवघ्या 2 मिनिटं 8 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये साहस, देशप्रेम, इच्छाशक्ती, शत्रूप्रतीचा द्वेष आणि परिस्थितीवर मात करून संकटांना सामोरं जाण्याचा प्रचंड आत्मविश्वास अशा भावनाची झलक अतिशय प्रत्ययकारिपणे पाहता येत आहे. कमाल युद्ध दृश्य, प्रभावी संगीत ही या टीझरची जमेची बाजू असून साहसदृश्य पाहता चित्रपट रसिकांसाठी '120 बहादूर' हा चित्रपट एक परवणी असेल असं म्हणणं गैर ठरणार नाही.

Read More