Marathi News> मनोरंजन
Advertisement

उतारवयात असे दिसतील 'हे' कलाकार, एकदा पाहाच

ओळखलं का हे आहेत तरी कोण...? 

उतारवयात असे दिसतील 'हे' कलाकार, एकदा पाहाच

मुंबई: हल्ली प्रत्येकजण हे आपल्या लूकविषयी बरीच कालजी घेत असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे चेहऱ्यावर असणारी साधी एक सुरकुतीसुद्धा अनेकांना तणाव देऊन जाते. पण, काही बी- टाऊन सेलिब्रिटींनी मात्र ते म्हातारपणी कसे दिसतील हे अगदी सुरेखपणे कशाचीही तमा न बाळगता सर्वांच्या समोर आणलं आहे. 

सोशल मीडियावर सध्या या सेलिब्रिटींच्याच लूकची चर्चा होत आहे. 

'दंगल' फेम दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने कलाकार मंडळींनी हे रुप घेतलं असल्याचं कळत आहे. 

'फॉक्स स्टार स्टुडिओज'ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचं नाव 'छिछोरे' असं असून त्याचा फर्स्ट लूक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यामध्ये 'कुत्ते की दुम टेढी की टेढी' ही टॅगलाईन सर्वाधिक लक्ष वेधत आहे.

३० ऑगस्ट २०१९ या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याचा फर्स्ट लूक पाहता येत्या काळात चित्रपटाविषयीचं कुतूहल आणखी वाढणार असंच म्हणावं लागेल.तोपर्यंत उतारवयातील लूकमुळे चर्चेत आलेल्या या सेलिब्रिटींच्या लूकचीच चर्चा असणार हे खरं. 

Read More