Marathi News> मनोरंजन
Advertisement

सोनालीमागोमाग 'या' अभिनेत्रीलाही कॅन्सर

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या आधारे आपल्याला कॅन्सर झाल्याचं सांगितलं होतं. 

सोनालीमागोमाग 'या' अभिनेत्रीलाही कॅन्सर

मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या आधारे आपल्याला कॅन्सर झाल्याचं सांगितलं होतं. ज्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने आपल्याला या आजाराने ग्रासल्याचं सांगत त्यावर उपचार सुरु असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या आजारपणाची माहिती देणाऱ्या त्या अभिनेत्रीचं नाव आहे नफिसा अली. 

अली यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत कशा प्रकारे आपल्या एका मैत्रीणीने या आजाराशी झुंज देण्यासाठी आपल्याला प्रेरणा दिली, याविषयीची माहिती लिहिली. त्यांची ही जवळची आणि तितकीच खास मैत्रीण म्हणजे माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी. 

नफीसा यांनी आपल्या आजारपणाविषयी दिलेली ही माहिती पाहता चाहत्यांना धक्काच बसला. 

आजारपण इतकं बळावल्यानंतर त्यांनी याविषयी वाच्यता केल्यामुळे अनेकांनीच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करत त्या लवकरात लवकर या आजारावर मात करतील, अशी कामना चाहत्यांनी केल्याचं पाहायला मिळालं. 

नफीसा यांनी १९७९ मधील शशी कपूर यांची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या 'जुनून' या चित्रपटातून अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. 

Read More