मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्या मुलीनं म्हणजेच सारा अली खान हिनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्या क्षणापासून कायमच सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. माध्यमांशी साराशी असणारं खास नातं असो, किंवा एखाद्या कार्यक्रमात साराचा अनोखा आणि तितकाच मनं जिंकणारा स्वभाव असो.
सारा चर्चेत नाही, असं फार क्वचितच घडलं आहे.
आता म्हणे सैफची ही लेक गळ्यात मंगळसूत्र आणि नववधुच्या रुपातच सर्वांसमोर आली आहे. तिचा हा 'अतरंगी' अंदाज सर्वांच्याच मनात काही प्रश्न उपस्थित करत आहे.
आता तुम्ही म्हणाल, साराचं लग्न, तेही पळून वगैरे?
तर, तसं नाहीये. हा सारा घाट घातला गेला आहे साराच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी.
ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टार (Hot Star) वर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. धनुष, अक्षय कुमार आणि सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटामध्ये आहेत.
सारा पहिल्यांदाच एखाद्या मल्टीस्टारर चित्रपटामध्ये झळकत आहे. असं असतानाही अभिनयानं तिनं सर्वांचीच मनं जिंकली आहेत.
आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटामध्ये ती अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासोबत रोमान्स करताना दिसत आहे.
चित्रपटाचं संगीत ही त्याची उजवी बाजू ठरत आहे. दोन बॉलिवूड कलाकारांना धनुषच्या अभिनयाची जोड मिळाल्यामुळं हे त्रिकूट भलतीच जादू करत आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यामुळं या चित्रपटावर लगेचच असंख्य प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
आश्चर्यानं धनुष आणि खिलाडी कुमारपेक्षा इथं सारा अली खानच्या अभिनयाची प्रशंसा करत आहेत.
चित्रपटाच्या कथेमुळं कलाकारांचा अभिनय आणखी उठून येत आहे. त्यामुळं ही अतरंगी घडी चांगलीच जमलीये अशीच प्रतिक्रिया चाहते देत आहेत.
#AtrangiRe UNIQUELY BRILLIANT
— Sumit Kadel (@SumitkadeI) December 23, 2021
Rating-
ACE combo of @aanandlrai - Himanshu Sharma are back with a excellently written & directed saga. A SPECIAL love story rides on strong humor,emotions & EXTRAORDINARY acts by #Dhanush & #SaraAliKhan while @akshaykumar being the USP. pic.twitter.com/nRqYoox6uG
सारा आणि धनुष-अक्षयचा हा अतरंगीपणा ज्यानी पाहिला, त्यांना भावला. पण तुमचं काय?