Marathi News> मनोरंजन
Advertisement

मानवी संगणकाची झलक पाहिली का?

नसेल पाहिली तर या व्हिडिओतून अंदाज येईलच..... 

मानवी संगणकाची झलक पाहिली का?

मुंबई : काही दमदार चित्रपटामधघ्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कलाकार हे कायमच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. आपल्याच अभिनय कौशल्याला आव्हान देत प्रत्येक वेळी काहीतरी नवं करण्यासाठी उत्सुक असणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. 

'तुम्हारी सुलू', 'मिशन मंगल' या चित्रपटांमधून झळकल्यानंतर विद्या आता एक अफलातून पात्र प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाली आहे. गणिततज्ज्ञ 'शकुंतला देवी', या चित्रपटातून ती झळकणार आहे. या माध्यमातून एका असामान्य व्यक्तीमत्वाच्या प्रवासावर प्रकाशझोत टाकला जाणार आहे. 

सोशल मीडियावर विद्याने शेअर केलेल्या या तित्रपटाच्या टीझरमध्ये ती एका चुटकीसरशी गणितं सोडवतानाने नेमका कसा दृष्टीकोन ठेवत असेल याची झलक पाहायला मिळत आहे. 

पिवळ्या रंगाची साडी आणि तोकड्या केसांमध्ये विद्याचं सौंदर्य आणखी खुलून येत आहे. अतिशय सोबर पण, तितक्याच प्रभावी अशा या लूकमध्ये दिसणारी विद्या पुन्हा एकदा सर्वांचीच मनं जिंकून जात आहे. 

'जग नेमकं आकड्यांकडे कसं पाहतं तो दृष्टीकोनच त्यांनी बदलला. चला.... साजरा करुया या गणिततज्ज्ञाच्या बुद्धिमतेला...', असं कॅप्शन तिने चित्रपटाच्या टीझरला दिलं. अभिनेत्री सान्या मल्होत्रासुद्धा या चित्रपटातून झळकणार आहे. शकुंतला देवी यांच्या मुलीच्या भूमिकेत ती झळकणार आहे. त्यामुळे आई आणि मुलीची ही जोडी आता प्रेक्षकांची मनं जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Read More