Marathi News> मनोरंजन
Advertisement

Christmas 2018 photos : 'कपूर अँड सन्स'चं ख्रिसमस सेलिब्रेशन आणि बरंच काही

सर्व भावंड आणि सदस्य एकत्र येत या दिवशी सहभोजनाचा आनंद घेतात. 

Christmas 2018 photos : 'कपूर अँड सन्स'चं ख्रिसमस सेलिब्रेशन आणि बरंच काही

मुंबई : हिंदी कलाविश्वात काही कुटुंबांकडे अतिशय आदराने पाहिलं जातं. अशाच कुटुंबांमधील एक नाव म्हणजे कपूर. भारतीय कलाविश्वात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या कुटुंबात बऱ्याच वर्षांपासून काही परंपरा सुरु आहेत. मग ते होळी, धुळवड साजरा करणं असो किंवा गणेशोत्सवाची धूम. प्रत्येक वेळी एखाद्या गोष्टीचा आनंद साजरा करावा तर तो कपूर कुटुंबानेच तेही मोठ्या दणक्यात अशीच प्रतिक्रिया काही सिनेरसिक देतात. 

सध्या हे कालाकारांचं हसतंखेळतं कुटुंब चर्चेत आहे ते म्हणजे त्यांच्या यंदाच्या ख्रिसमस लंचमुळे. बऱ्याच वर्षांपासून कपूर घराण्यात ख्रिसमसच्या दिवशी सर्व भावंड आणि सदस्य एकत्र येत या दिवशी सहभोजनाचा आनंद घेतात. 

यंदाही ख्रिसमसच्या निमित्ताने दिवंगत अभिनेते शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर यांनी त्यांच्या घरी या सहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर, त्यांच्या मुली अभिनेत्री करीना कपूर खान, करिष्मा कपूर यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. 

fallbacks

fallbacks

इन्स्टा स्टोरी आणि काही पोस्टमुळे या सहभोजन समारंभाचे काही सुरेख फोटोही पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली. करिषस्माने आपल्या कुटुंबाच्या या समारंभातीलच फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ख्रिसमस सहभोजनाची परंपरा अजूनही सुरुच आहे. इथे येऊ न शकलेल्या सर्वच सदस्यांची यावेळी फार आठवण आली..... ' तिने पोस्ट केलेला फोटो पाहता, हे सेलिब्रेशन नेमकं कसं असेल याचीच प्रचिती चाहत्यांना आली. 

Read More