Marathi News> मनोरंजन
Advertisement

Pornography Case:राज कुंद्रा अटकप्रकरणी चर्चेत असलेल्या या 5 मॉडेल्स; जाणून घ्या कोण काय म्हटलं?

बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राच्या पतीला अटक केल्यानंतर काही मॉडेल्स चर्चेत आल्या आहेत. या मॉडेल्सने राज कुंद्रांच्या पॉर्न निर्मिती केसबाबत आपले मत प्रकट केले आहे

Pornography Case:राज कुंद्रा अटकप्रकरणी चर्चेत असलेल्या या 5 मॉडेल्स; जाणून घ्या कोण काय म्हटलं?

नवी दिल्ली : बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राच्या पतीला अटक केल्यानंतर काही मॉडेल्स चर्चेत आल्या आहेत. या मॉडेल्सने राज कुंद्रांच्या पॉर्न निर्मिती केसबाबत आपले मत प्रकट केले आहे. राज कुंद्रा यांच्यावर पॉर्न चित्रपट बनवण्याचा व्यवसाय केल्याचा आरोप आहे. परंतु या मॉडेल्सचे राज यांच्याबाबत काय म्हणणे आहे हे जाणून घेऊ या

पूनम पांडे -
या दिवसांमध्ये पूनम पांडेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तिने खुलासे केले आहेत. पूनम पांडेच्या स्वतःच्या App ची देखरेख राज कुंद्रा यांची कंपनी करते. याशिवाय पूनम पांडेने म्हटले की, त्यांना धमकाऊन कॉंन्ट्रॅक्ट साइन करण्यात आला. ज्यामध्ये त्यांना शूट करायचे आहे, त्यांच्या इच्छेनुसार पोझ द्यायच्या आहेत. त्यांच्या इच्छेनुसार दिसयाचे आहे. असे न केल्यास तीचे  खासगी क्षण लिक करण्याची धमकी देण्यात आली आहे.

गहना वशिष्ट -
OTT वर असलेली बोल्ड वेब सिरिज गंदी बातची अग्रणी अभिनेत्री गहना वशिष्ट राज कुंद्रांच्या प्रकरणात आधीपासून त्याच्या समर्थनात दिसत आहे. तिचे म्हणणे आहे की, राज कुंद्रांनी निर्माण केलेल्या ज्या व्हिडिओंची  चर्चा होत आहे. ते बोल्ड आहेत. परंतु पॉर्नच्या श्रेणीत येत नाही. 

शर्लिन चोप्रा -
प्ले बॉय मासिकाची कव्हरगर्ल राहिलेली शर्लिन चोप्राने नुकताच एक व्हिडिओ जारी केला आहे. तिने राज कुंद्रा प्रकरणाबाबत म्हटले की, मी महाराष्ट्र सायबर सेलसमोर आपले म्हणणे मांडले आहे. ती या विषयावर काहीही बोलनार नाही. 

सागरिका शोना  सुमन-
सागरिकाला राज कुंद्राने न्युड ऑडिशन देण्यास सांगितले होते. तेव्हापासून ती बातम्यांमध्ये चर्चेत होती. सागरिकाने एका व्हिडिओमध्ये म्हटले की, एका वेब सिरिजसाठी तिला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ऑडिशन देण्यास सांगण्यात आले. त्यावेळी तीन लोकांनी तिला न्यूड ऑडिशन देण्यास सांगितले. त्यामध्ये राज कुंद्रा देखील होते.

पूनित कौर -
इतर अभिनेत्रींप्रमाणे पूनित कौरने म्हटले आहे की, तिला राज कुंद्राच्या हॉटशॉट या मोबाईल App साठी काम करण्यासाठी संपर्क करण्यात आला होता.

Read More