Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ranbir- Alia Wedding : रणबीर- आलियाच्या 15 मजली घराबद्दल 'या' गोष्टी ठाऊकच नसतील

वैवाहिक आयुष्याची सुरुवात करत असतानाच आलियाला काही नव्या गोष्टी थक्क करणार आहेत यात शंका नाही.

Ranbir- Alia Wedding : रणबीर- आलियाच्या 15 मजली घराबद्दल 'या' गोष्टी ठाऊकच नसतील

Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : प्रेमाचं नातं एका नव्या टप्प्यावर नेत अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आता विवाहबंधनात अडकणार आहेत. वैवाहिक आयुष्याची सुरुवात करत असतानाच आलियाला काही नव्या गोष्टी थक्क करणार आहेत यात शंका नाही. 

कपूर कुटुंबाची सून होण्यासोबतच आलियाला सर्वात मोठी भेट मिळणार आहे, ते म्हणजे त्यांचं नवं घर. गेल्या बऱ्याच काळापासून कपूर कुटुंबाचं हे नवं घर उभं राहत आहे. 

मुंबईतील वांद्रे इथं असणाऱ्या पाली हिल परिसरात ही मोठी इमारत उभी राहत आहे. सध्या या निर्माणाधीन इमारतीला सुरेख अशी सजावट करण्यात आली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार या इमारतीतील 15 पैकी 5 मजले कपूर कुटुंबाचे असतील. तर, उर्वरित मजले भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. लग्नानंतर रणबीर आणि आलिया  ‘कृष्णा राज बंगला’ या त्यांच्या नव्या घरात वास्तव्यास जातील. 

सध्या या घराच्या कामांना प्रचंड वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. 1980 मध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी  ‘कृष्णा राज बंगला’ खरेदी केला होता. या इमारतीचं संपूर्ण काम पूर्ण होण्यास जवळपास 6 वर्षांचा काळ जाईल. पण, तूर्तास त्याचे पाच मजले मात्र पूर्ण तयार असल्याचं कळत आहे. 

वडील ऋषी कपूर यांच्या आठवणीही या घरात जपण्यात येणार आहेत. रणबीर आणि आलिया यांच्यासोबत नीतू कपूरसुद्धा या नव्या घरात वास्तव्यास जाणार असल्याचं म्हटसं जात आहे. तेव्हा आता आलियाचा या नव्या घरात गृप्रवेश केव्हा होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. 

Read More