Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ahemdabad Plane Crash नं बॉलिवूड सुन्न; पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दु:ख

Ahemdabad Plane Crash : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ एयर इंडियाचं एक विमान क्रॅश झालं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींची देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.   

Ahemdabad Plane Crash नं बॉलिवूड सुन्न; पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दु:ख

Ahemdabad Plane Crash : आज अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेलपासून थोड्या अंतरावर असलेल्या मेघानी येथे एअर इंडियाचं बोईंग 787 हे विमान पडलं. या विमानामध्ये 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथले व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर बॉलिवूड कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. रितेश देशमुख, रणदीप हुड्डा आणि सोनू सूदसोबत अनेक कलाकारांनी या घटनेनं दु:खी असल्याचं म्हटलं. 

परिणीति चोप्रानं लिहिलं की 'आज एअर इंडियाच विमान कोसळलं आणि या अपघातात ज्या लोकांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य गमावले त्यांना किती दु:ख होत असेल याची कल्पना करू शकत नाही. या कठीण काळात देवानं त्यांना शक्ती द्यावी हीच प्रार्थना.' 

सनी देओलनं पोस्ट शेअर करत म्हणाला, 'अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची बातमी ऐकून धक्का बसला. जे लोक या अपघातात वाचलेत त्यांच्यासाठी मनापासून प्रार्थना करतोय. ते लवकरात लवकर भेटतील आणि त्यांना हवी ती काळजी मिळायला हवी ही प्रार्थना करतोय. ज्या लोकांचा जीव गेला आहे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबाला ताकद मिळो.' 

रितेश देशमुखनं पोस्ट शेअर करत म्हटलं की 'अहमदाबादमध्ये झालेल्या या विमान अपघाता विषयी ऐकून वाईट वाटलं आणि मोठा धक्का बसला आहे. या घटनेत जखमी झालेल्या आणि जीव गमावलेल्या सगळ्या प्रवाशांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि ज्यांच्या जमीनिवर परिणाम झाला आहे, त्यांच्या सगळ्यांच्या दु:खात आहे. हा काळ अतिशय कठीण आहे. मी मनापासून प्रार्थना करतो की त्यांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळावं.'

रणदीप हुड्डानं लिहिलं की 'अहमदाबादमध्ये जो विमान अपघात झाला ते खूप वाईट झालं, त्याविषयी ऐकूण मन सुन्न झालं आहे. मी सगळ्यांसाठी प्रार्थना करत आहे. ज्या लोकांनी त्यांच्या जवळच्या लोकांना गमावलं त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. ज्यांनी जीव गमावला आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि ज्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना गमावलं त्यांना शक्ती मिळो.' 

सोनू सूदनं यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे, 'एयर इंडियाच्या विमानासाठी प्रार्थना करतो की लंडनला जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांनी या दुर्घटनेत जीव गमावला.' 

थलपती विजयनं देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, 'अहमदाबाद विमानतळा जवळ झालेल्या एयर इंडिया अहमदाबाद-लंडन विमानासोबत जी घटना झाली ती ऐकून धक्का बसला. सगले प्रवासी आणि पायलेटच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो.'  

अक्षय कुमारनं देखील पोस्ट शेअर करत म्हटलं की 'या घटने विषयी कळाल्यानंतर मला मोठा धक्का बसला आहे आता फक्त प्रार्थना करू शकतो.'

फक्त बॉलिवूड सेलिब्रिटी नाही तर सर्वसामान्य देखील या सगळ्या प्रवाशांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहेत.

Read More