Actor Dhanush Viral Video : दाक्षिणात्य सुपरस्टार, अभिनेता रजनीकांत यांच्या लेकीसोबतं असणारं वैवाहिक नातं आणि दक्षिणेकडील कलाक्षेत्रात दिलेल्या योगदानामुळं अभिनेता धनुषसुद्धा कायमच चर्चेचा विषय ठरला. धनुषची रुपेरी पडद्यावरची केमिस्ट्रीसुद्धा काही अभिनेत्रींसोबत विशेष गाजली. इथं खासगी जीवनात त्याच्या आणि ऐश्वर्याच्या नात्यात मीठाचा खडा पडून त्यांच्या वाटा वेगळ्या झालेल्या असतानाच आता धनुष त्याच्या व्यक्तीगत जीवनात बराच पुढे गेल्याचं म्हटलं आहे.
नुकताच 'रांझणा' चित्रपटाच्या AI वर्जनवर संतापणाक्या धनुषचं दुसऱ्याच दिवशी एका मराठमोळ्या अभिनेत्रीशी नाव जोडलं गेलं आहे. पोहे या पदार्थावरील प्रेम म्हणजे सर्वकाही... असं मुलाखतींमध्ये प्रचंड जिव्हाळ्यानं सांगणारी ही अभिनेत्री आणि धनुष हल्लीच म्हणजे एका पार्टीमध्ये एकत्र दिसले, जिथं त्यांचा हातात हात धरलेला व्हिडीओ कॅमेरानं टीपला आणि तिथपासूनच त्यांच्या 'डेटिंग रुमर्स'ना उधाण आलं.
धनुषसोबत नाव जोडलं जाणारी ही अभिनेत्री आहे मृणाल ठाकूर. मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज विश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर लोकप्रियता मिळवणाऱ्या मृणाल ठाकूर आणि धनुषचा व्हिडीओ सध्या सिनेरसिक वारंवार पाहत असून खरंच यांचं काही सुरू आहे का? असा कुतूहलपूर्ण प्रश्नसुद्धा उपस्थित करताना दिसत आहेत.
सिनेजगतातील सूत्रांच्या माहितीनुसार आणि बहुतांश चर्चांनुसार धनुष हल्लीच मृणालच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत पोहोचला होता. त्यात पार्टीतील व्हिडीओ समोर आला असून, या व्हिडीओमध्ये त्यानं मृणालचा हात धरल्याचं स्पष्ट पाहायला मिळत असून या कारणामुळं सध्या हे दोन्ही सेलिब्रिटी एकमेकांना डेट करत असल्याचं अर्थात एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत असल्याचं म्हटलं जात आहे. (Dhanush Dating Mrunal Thakur?)
Dhanush and Mrunal Thakur are dating? pic.twitter.com/ItWYJdsm8a
— Aryan (@Pokeamole_) August 3, 2025
बरं, त्यांचं असं एकत्र दिसण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा मृणाल, धनुषच्याच एका चित्रपटाच्या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. निर्माती कनिका ढिल्लननं या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर जेव्हा शेअर केले तेव्हा त्यातही धनुष आणि मृणाल एकत्र पोझ देताना दिसले. प्रत्यक्षात मृणाल, धनुष किंवा दोघांपैकी कोणा एकाच्याही टीमकडून यासंदर्भातील अधिकृत माहिती किंवा या वृत्ताला दुजोराही देण्यात आलेला नाही. मात्र तरीसुद्धा चाहत्यांमध्ये कुतूहल चाळवण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ पुरेसा ठरत आहे.
धनुष आणि मृणाल ठाकूर डेटिंगच्या अफवांबाबत काय चर्चा आहे?
धनुष आणि मृणाल ठाकूर यांना अलीकडेच मृणालच्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र पाहिले गेले, जिथे त्यांचा हातात हात धरलेला व्हिडीओ व्हायरल झाला.
धनुष आणि मृणाल ठाकूर यापूर्वी कुठे एकत्र दिसले होते?
यापूर्वी जुलै 2025 मध्ये धनुषच्या आगामी चित्रपट 'तेरे इश्क में'च्या रॅप-अप पार्टीत मृणाल उपस्थित होती. तसेच, काजोलच्या 'माँ' आणि मृणालच्या 'सन ऑफ सरदार 2' च्या स्क्रीनिंग इव्हेंटमध्येही दोघे एकत्र दिसले होते.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?
व्हायरल व्हिडीओमध्ये धनुष आणि मृणाल ठाकूर मृणालच्या वाढदिवसाच्या पार्टीत जवळून बोलताना आणि हात धरताना दिसत आहेत. याच व्हिडीओमुळे डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे.