Marathi News> मनोरंजन
Advertisement

सापानं मला दंश मारला आणि...; 'त्या' गंभीर अपघातानंतर सलमान पहिल्यांदाच कॅमेरासमोर...

एकच चिंतेची लाट पाहायला मिळाली. 

सापानं मला दंश मारला आणि...; 'त्या' गंभीर अपघातानंतर सलमान पहिल्यांदाच कॅमेरासमोर...

मुंबई : तिथे अभिनेता सलमान खान याच्या वाढदिवसाची तयारी सुरु झालेली असतानाच इथे बातमी आली, ती म्हणजे त्याला सापानं दंश मारल्याची. सलमानला सर्पदंश झाल्याचं चाहत्यांच्या कानी आलं आणि एकच चिंतेची लाट पाहायला मिळाली. 

साप सलमानपर्यंत पोहोचला तेव्हा... 
सर्पदंशातून सलमान बचावला असला तरीही तो जेव्हा प्रत्यक्षात समोर आला, तेव्हाच यावर चाहत्यांचा विश्वास बसला. 

एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सलमान म्हणाला, 'एक साप माझ्या फार्महाऊसवर आला तेव्हा मी त्याला काठीनं बाहेर काढलं. 

सापानं मला दंश मारला आणि...; 'त्या' गंभीर अपघातानंतर सलमान पहिल्यांदाच कॅमेरासमोर... https://zeenews.india.com/marathi/entertainment/bollywood-salman-khan-birthday-snake-bite-experiance/598349

पण, तो कसाबसा माझ्या हातापर्यंत पोहोचला. मी त्याला तेव्हा पकडलं आणि तितक्यातच चावला चावला असा आवाज तिथं झाला. 

त्यानं तिनदा मला दंश मारला. ज्यानंतर मला रुग्णालयात नेण्यात आलं. मी तिथं जवळपास 6 तासांसाठी होतो.'

रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर सलमाननं थेट फार्महाऊस गाठलं. जिथे त्यांचं कुटूंब आणि मित्रपरिवार त्याच्याच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पोहोचले होते. 

प्रकृती उत्तम असल्याचं कळताच सलमनाच्या कुटुंबानं सुटकेचा नि:श्वास सोडला. पाहता पाहता अभिनेत्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर आनंदी आणि उत्साही वातावरण पाहायला मिळालं. 

हा आनंद आणि उत्साह होता भाईजानच्या 56 व्या वाढदिवसाचा. 

Read More