Marathi News> मनोरंजन
Advertisement

35 वर्षांपूर्वीचा रेल्वेप्रवास, मित्रमैत्रीणी आणि शाहरुख खान... अभिनेत्याव्यतिरिक्त इतर चेहरे ओळखता येतायत?

Shah Rukh Khan Photos : शाहरुख खानचे कधीही न पाहिलेले फोटो समोर येताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का. एक सिक्रेट फोटो अल्बम सर्वांसरमोर...   

35 वर्षांपूर्वीचा रेल्वेप्रवास, मित्रमैत्रीणी आणि शाहरुख खान... अभिनेत्याव्यतिरिक्त इतर चेहरे ओळखता येतायत?

Shah Rukh Khan Old Photos : हिंदी कलाविश्वामध्ये कैक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये एक नाव कायमच अग्रस्थानी असतं आणि ते नाव म्हणजे बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान याचं. शून्यातून विश्व उभं करणं म्हणजे नेमकं काय? या वाक्याचा जीवित रुपात पाहायचं झाल्यास शाहरुख खान हे त्याचच एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. 
 
सध्या शाहरुख सिनेजगताचा बादशाहा असला तरीही त्यापूर्वी त्यानं त्याच्या थिएटर कंपनीसोबतची कमाल यश संपादन केलं होतं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये शाहरुख नेमकं काय करत होता, कवलाजगतात त्याचे सुरुवातीचे दिवस नेमके कसे होते यावर उजेड टाकणारे काही खास आणि तितकेच 'सिक्रेट' फोटो नुकतेच सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. 

शाहरुखच्या मित्रानं शेअर केला खास अल्बम... 

किंग खानचे खास मित्र आणि अभिनेते अमर तलवार यांनी हे कधीही आणि कोणीही न पाहिलेले फोटे सोशल मीडियावर नुकतेच शेअर केले. या फोटोंमध्ये शाहरुख खान त्याच्या या कलाकार मित्रमैत्रिणींसमवेत रेल्वेप्रवास करताना दिसत आहे. साधारण 35 वर्षांपूर्वीच्या या छायाचित्रांमध्ये शाहरुख आणि त्याच्या या कलाकार मित्रांना पाहताना कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण जसा उत्साही, काहीसा नवखा आणि अतिउत्साही दिसतो, अगदी तशीच ही मंडळसुद्धा दिसत असल्याचं फोटो पाहताना लक्षात येतं. 

रेल्वेनं प्रवास करताना बरीच मंडळी उगाचच रेल्वेच्या दारापाशी उभं राहून फोटो काढून घेतात, इथं शाहरुखचाही तसाच फोटो पाहायला मिळत असून, तरुणाईत किंग खानलाही तसा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही हेच फोटो पाहताना लक्षात येतं. हातात कॅमेरा, मित्रमंडळींसोबत कल्ला आणि स्वत:चाच शोध घेणारा शाहरुख असे हे फोटो पाहताना चाहतेसुद्धा भारावल्याचं पाहायला मिळत आहे. 

तलवार यांनी शेअर केलेल्या या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, '35 वर्षांपूर्वीच्या त्या रेल्वे प्रवासातून आणखी काही फोटो. दिल्ली ते कोलकाता. दिव्या, दीपिका, शाहरुख, संजॉय आणि दीपक आणि ऋतूराज आणि बेनी आणि मोहित... मी कॅमेरामागे आणि तो बेरी कुठंय?' एखादा मित्र जुने फोटो सापडल्यानंतर ज्या उत्साहात ते सर्वांना दाखवतो आणि आठवणी सांगतो अगदी त्याचप्रमाणे इथं हे फोटो शेअर करताना हे कॅप्शन लिहिण्यात आलं आहे. 

फोटो शेअर करणाऱ्या अमर तवार यांनी दूरदर्शनवरील 'शांती- एक घर की कहानी' या 1994 मधील मालिकेतून लोकप्रियता मिळवली होती. शाहरुखसोबत ते 2001 मधील 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात झळकले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Monika Lang (@monikalang02)

कलाक्षेत्रात काम करणारे शाहरुखचे हे मित्र आज त्यांच्यात्यांच्या जीवनात व्यग्र असले तरीही 35 वर्षांपूर्वीचा त्यांचा हा प्रवास आणि या प्रवासातील काही क्षण पाहता तो प्रवास नक्कीच अविस्मरणीय असेल असं म्हणायला हरकत नाही. बरं, 35 वर्षांपूर्वीचा शाहरुख आणि आज त्यानं मिळवलेलं यश पाहता खरंच त्याच्या करिअरचा आलेख इतरांसाठी प्रेरणास्त्रोत आहे, असंही काही चाहत्यांचं मत. 

Read More