Marathi News> मनोरंजन
Advertisement

सिद्धार्थही चढणार बोहल्यावर? किआरासोबत लग्नाचा अखेर उलगडा

मागील काही दिवसांपासून किंबहुना साधारण मागील वर्षभरापासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं गेलं. त्यांच्या डेटिंगच्या चर्चा, फोटो आणि व्हिडीओही समोर आले. नववर्षाचं स्वागत करणं असो किंवा मग कोणा एका कार्यक्रमासाठी हजर राहणं असो. सिद्धार्थ आणि किआराला बऱ्याच ठिकाणी सातत्यानं एकत्र पाहायला मिळालं. 

सिद्धार्थही चढणार बोहल्यावर? किआरासोबत लग्नाचा अखेर उलगडा

मुंबई : मागील काही दिवसांपासून किंबहुना साधारण मागील वर्षभरापासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं गेलं. त्यांच्या डेटिंगच्या चर्चा, फोटो आणि व्हिडीओही समोर आले. नववर्षाचं स्वागत करणं असो किंवा मग कोणा एका कार्यक्रमासाठी हजर राहणं असो. सिद्धार्थ आणि किआराला बऱ्याच ठिकाणी सातत्यानं एकत्र पाहायला मिळालं. 

सिड आणि किआराच्या या नात्याबाबत आता चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार मंडळी खासगी जीवनात लग्नबंधनात अडकत असतानाच आता सिद्धार्थ आणि किआराच्या नावावर लग्नाचं शिक्कामोर्तब केव्हा होणार हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Bollywood shershaah-actor-sidharth-malhotra-marriage-plans-kiara-adavni)

'शेरशाह' या चित्रपटाच्या निमित्तानं किआरा आणि सिद्धार्थनं स्क्रीन शेअर करत प्रेमी युगूलाची भूमिका साकारली. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहून या दोघांच्याही नात्याला बऱ्याच चर्चांचं वलय मिळालं. अखेर आता सिद्धार्थनं किआरासोबत्या सप्तपदीबाबत आपलं मौन सोडलं आहे. 

एके ठिकाणी मुलाखतीदरम्यान तू लग्न केव्हा करत आहेस?  असा प्रश्न सिद्धार्थला विचारण्यात आला. त्यावेळी त्यानं समर्पक असंच उत्तर दिलं. 'मला नाही ठाऊक मी केव्हा लग्न करेन. मी काही ज्योतिषी वगैरे नाही. लग्न केव्हा करेन यापेक्षा जास्त महत्त्वाचं असेल लग्न कोणासोबत करेन, त्यामुळं लग्न जेव्हा होईल, ज्या कोणासोबत होईल, मी नक्कीच सांगेन', असं सिद्धार्थ म्हणाला. 

चाळीशीत लग्न करण्याचा विचार आहे का, असं विचारलं असता, लग्नासाठी वेळेची सीमा नाही. पण, ते जेव्हा होईल तेव्हा चांगल्या पद्धतीनेच झालं पाहिजे. जास्त घाई किंवा जास्त उशीरही करायला नको असंही तो म्हणाला. 

किआरामधील हा गुण फार भावतो... 
किआरामधील कोणती एक गोष्ट तुला अधिक आवडते आणि कोणती गोष्ट तू बदलू इच्छितोस असं, विचारलं असता सिद्धार्थ म्हणाला, 'किआराचा एक गुण मला आवडतो तो म्हणजे ती ऑफ कॅमेरा फारच वेगळी आहे. तिला कोणी म्हणूच शकत नाही की, ही एक अभिनेत्री आहे. ती फार सर्वसामान्यपणे वावरते हेच मला आवडतं. मीसुद्धा काहीसा तसाच आहे.' किआरामध्ये आपण कोणतीही गोष्ट बदलू इच्छित नसल्याचं सांगत त्यांनं तिच्यासोबत आपली लव्हस्टोरी नसल्याचंही सांगितलं. 

सिद्धार्थनं एकिकडून नात्याला दिलेला नकार, दुसरीकडून या दोघांची एकमेकांप्रती दिसणारी ओढ पाहता, कुठंतरी काहीतरी धुमसतंय अशीच प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिली. 

Read More