Marathi News> मनोरंजन
Advertisement

आशाताईंचा ८६व्या वर्षीही मस्तमौला अंदाज

'रात सुहानी सी...झाले दिवानी मी'

आशाताईंचा ८६व्या वर्षीही मस्तमौला अंदाज

मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रात गेल्या कित्येक दशकांपासून आपल्या आवाजाची जादू कायम असणाऱ्या आशा भोसले यांनी वयाच्या ८६व्या वर्षी मस्तीभऱ्या अंदाजात एक क्लब साँग गायलं आहे. 'व्हॉट्सॲप लव्ह' या मराठी चित्रपटासाठी त्यांनी गायलेलं क्लब साँग प्रदर्शित करण्यात आलं आहे.

अजिता काळे आणि साहील सुल्तानपुरी या गीतकारांची रचना असलेल्या 'रात सुहानी सी...झाले दिवानी मी' या गाण्याला आशाताईंनी स्वरबद्ध केलं आहे. 

आशाताईंना जेव्हा हे गाणं ऐकवण्यात आलं त्यावेळी त्यांनी उत्साही प्रतिक्रिया दिली. आशाताईंनी 'क्लब साँग, तेही मराठीत...अरे वा!' असं म्हणत म्हणत त्यांनी गाण्याबाबत उत्सुकता दर्शवली असल्याचं संगीतकार नितीन शंकर यांनी सांगितलं.

आशाताईंनी गायलेलं गाणं एका आलिशान क्लबमध्ये, राकेश बापट आणि पल्लवी शेट्टी यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. आशाताईंचे जादुई सुर, विठ्ठल पाटील यांचं नृत्यदिग्दर्शन आणि ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांच्या कलात्मक दृष्टीतून साकारलेले हे गाणं प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. नानुभाई सिंघानिया यांच्या व्हिडियो पॅलेस या युट्युब चॅनेलवर हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

एच.एम.जी एंटरटेनमेंट निर्मित आणि जम्पिंग टोमॅटो प्रस्तुत रोमॅंटीक म्युझिकल चित्रपट 'व्हॉट्सॲप लव्ह' चित्रपट येत्या शुक्रवारी १२ जुलै रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Read More