Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपिल शर्माला हवेत तुमचे आशीर्वाद, काय मग लग्नाला येणार ना?

'आमच्या लग्नाला यायचं हं....' 

कपिल शर्माला हवेत तुमचे आशीर्वाद, काय मग लग्नाला येणार ना?

मुंबई : 'आमच्या लग्नाला यायचं हं....' असं म्हणत २०१८ या संपूर्ण वर्षात बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींनी आयुष्यातील एका नव्या पर्वाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. सोनम कपूर, दीपिका पदुकोण आणि बऱ्याच टेलिव्हिजन कलाकारांनीसुद्धा लग्नगाठ बांधत नव्या इनिंगला सुरुवात केली. त्यात आता आणखी एक नाव जोडलं जात आहे. 

आपल्या अनोख्या विनोदी शैलीच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात घर करणारा विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्मा १२ डिसेंबरला त्याची प्रेयसी गिन्नी छतारथ हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. खुद्द कपिलनेच सोशल मीडियावर त्याची लग्नपत्रिका शेअर केली आहे. 

अतिशय सुरेख आणि सोबर अशा या पत्रिकेमध्ये गिन्नी आणि कपिलच्या नावांची मोहोर उमटवण्यात आली आहे. 

१२ डिसेबंरला शुभमुहूर्तावर गिन्नी आणि कपिल एकमेकांना आयुष्यभरासाठी साथ देण्याची वचनं देणार आहेत. यासाठी त्यांनी पत्रिकेद्वारे आपल्या या प्रवासात आतापर्यंत प्रत्येक चढऊतारामध्ये साथ देणाऱ्या आप्तजनांचे, चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

सोबतच कपिलने गिन्नीसोबतच्या या नव्या प्रवासासाठी सर्वांचे आशीर्वाद आणि सदिच्छा मागितल्या आहेत. तेव्हा आता विनोदवीराच्या या प्रवासात तुम्हीही सहभागी होणार ना? 

Read More