Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऋषी कपूर यांना कायम आनंदाने स्मरणात रहायला आवडेल; पत्नीची भावनिक पोस्ट

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने सारं कलाविश्व हळहळलं.   

ऋषी कपूर यांना कायम आनंदाने स्मरणात रहायला आवडेल; पत्नीची भावनिक पोस्ट

मुंबई : वर्षानुवर्षांच्या सहजीवनाच्या प्रवासात अभिनेत्री नीतू कपूर यांनी पती, अभिनेते Rishi Kapoor ऋषी कपूर यांना पावलोपावली साथ दिली. लग्नानंतर कलाविश्वातून काढता पाय घेत कुटुंबावर लक्ष केंद्रीत करण्यापासून ते अखेरच्या क्षणापर्यंत ऋषी कपूर यांचा आधार झालेल्या नीतू कपूर यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर एक भावनिक पोस्ट केली. 

सोशल मीडियावर संपूर्ण कपूर कुटुंबाच्या वतीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये खुद्द ऋषी कपूर यांना कायम आनंदानेच चाहत्यांच्या स्मरणात राहायला आवडेल असं लिहिलं. जीवनातील अखेरच्या क्षणापर्यंत ऋषी यांनी रुग्णालयातील कर्मचारी वर्गाचंही मनोरंजन केल्याचं भावस्पर्शी वाक्य त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं. 

जवळपास दोन वर्षे उपचारांच्या काळातही ऋषी कपूर मनमुराद आयुष्य जगले. कुटुंब, मित्र, खाण्याची आवड आणि चित्रपट या गोष्टी त्यांच्या एकाग्रतेची साक्ष देत होत्या. किंबहुना आजारपणाच्या काळातही त्यांचा हा स्वभाव अनेकांनाच आश्चर्यचकित करुन जात होता, असं लिहित ऋषी कपूर हे चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाचे कायमच कृतज्ञ होते असं नीतू यांनी न विसरता नमुद केलं. 

 
 
 
 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

 

आपल्या कुटुंबावर हे संकट आलेलं असतानाच सारं जगही एका संकटाचा सामना करत आहे, हे वास्तव मांडत कायद्याचं पालन करण्याचा एक सुरेख संदेश ऋषी कपूर यांच्या वतीने त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी दिला. 
वयाच्या ६७ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. एक काळ गाजवणारा हा अभिनेता जवळपास मागील दोन वर्षांपासून ल्युकेमिया या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धीमा कपूर असा परिवार आहे. 

 

Read More