Marathi News> मनोरंजन
Advertisement

'ते माझ्या कंबरेवर मारायचे, स्वत:चे नाक माझ्या नाकाला...' मुमताजकडून 'त्या' नात्यावर खुलासा!,

Mumtaj On Rajesh Khanna: 77 वर्षीय अभिनेत्री मुमताज यांनी 'रेडिओ नशा'शी बोलताना राजेश खन्ना यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा प्रसंगही सांगितला. 

'ते माझ्या कंबरेवर मारायचे, स्वत:चे नाक माझ्या नाकाला...' मुमताजकडून 'त्या' नात्यावर खुलासा!,

Mumtaj On Rajesh Khanna: ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज आणि राजेश खन्ना यांना सुमारे 15 चित्रपटांमध्ये काम केले होते. विशेष म्हणजे ते सर्व सिनेमा हिट झाले होते. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. दरम्यान मुमताज यांनी एका मुलाखतीत कथिक अफेअर्सच्या चर्चांवर खुलासा केला. राजेश खन्ना यांच्यासोबत कोणत्या प्रकारचे नाते होते? लोकांना काका म्हणजेच राजेश खन्नांसोबत तिचे अफेअर असल्याचे का वाटायचे? या सर्वावर त्या बोलल्या आहेत. 

77 वर्षीय अभिनेत्री मुमताज यांनी 'रेडिओ नशा'शी बोलताना राजेश खन्ना यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा प्रसंगही सांगितला. दोघांनीही 'आपकी कसम', 'रोटी', 'बंधन', 'प्रेम कहानी', 'सच्चा झूठा', 'दो रास्ते' आणि 'अपना देश' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.
मुमताज यांनी यावेळी राजेश खन्नासोबतच्या तिच्या पहिल्या भेटीची कहाणी सांगितली. 'मी त्यावेळी त्यांना ओळखत नव्हतो. राजेश खन्ना नावाचा एक हिरो आहे ज्याच्यासोबत तुम्हाला काम करायचंय असं मला कळालं आणि मी त्यांना भेटल्याचे मुमताज म्हणाल्या. त्यांना माझ्यासोबत काम करायचे आहे का? हे आधी त्यांना विचारा, असे मुमताज यांनी विचारायला सांगितले. अशाप्रकारे मला त्याच्यासोबतचा माझा पहिला चित्रपट 'दो रास्ते' मिळाला. ते माझ्याशी खूप दयाळू वागायचे. आम्ही खूप चांगले मित्र होतो, असेही त्या पुढे म्हणाल्या. 

'काका माझ्या कंबरेवर मारायचे, कधी नाकाला नाक घासायचे'

मुमताज यांनी राजेश खन्नांसोबतचा त्यांचा नाकाबद्दलचा किस्सा सांगितला.  आमच्या दोघांचे अफेअर सुरु आहे, असेच सर्वांना वाटायचे. जेव्हा तुम्ही एका हिरोसोबत 15 चित्रपट करता तेव्हा तुम्ही एकमेकांशी टायमिंग साधत असता. काका हे फक्त माझ्यासोबत करायचे. कधीकधी ते गाण्याच्या वेळी माझ्या चेहऱ्यावर काहीतरी लावायचे. कधी माझ्या कंबरेला मारायचे किंवा माझ्या नाकाला त्यांचे नाक लावायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली. 

'लोकांना वाटायचं आमच्यात अफेअर'

'लोकांना वाटायतं आमच्यात अफेअर चालू आहे, बघा ते किती एकमेकांशी क्लोज आहेत मुमताज काकांना जशी चिकटून राहते तशी ती कोणाशीही चिकटून राहत नाही. त्यात काहीतरी गडबड आहे, असे लोकं म्हणायचे. 

राजेश खन्नासोबत सर्वाधिक हिट चित्रपट 

मुमताजने राजेश खन्ना, धर्मेंद्र, शम्मी कपूर, देव आनंद, संजीव कुमार, राजेंद्र कुमार, मनोज कुमार आणि फिरोज खान सारख्या स्टार्ससोबत काम केले. पण राजेश खन्नासोबत त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सर्वोत्तम होती. मुमताज यांनी राजेश खन्नांसोबत सर्वाधिक हिट चित्रपट दिले आहेत.

राजेश खन्ना मुमताजबद्दल पझेसिव्ह?

राजेश खन्ना तुमच्याबद्दल पझेसिव्ह होते का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. 'प्रत्येक पुरूष त्याच्या आवडत्या महिलेबद्दल पझेसिव्ह असतो. प्रत्येक नायक त्याच्या आवडत्या आणि सुंदर नायिकेबद्दल पझेसिव्ह असतो', असे त्या म्हणाल्या. 

'यश चोप्रांना करायचं होतं मुमताजशी लग्न'

यावेळी मुमताज यांनी यश चोप्रा यांच्या नात्याबद्दलही खुलासा केला. 'यशजी मला खूप आवडायचे. त्यावेळी ते त्यांचे भाऊ बीआर चोप्रा यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करत होते. त्यांनादेखील मी आवडायचे.मी खूप सुंदर होते असं नाही, मी ठीक होते. म्हणून त्यांना मी आवडायची, असे मुमताज यांनी सांगितले. मी त्यावेळी खूप लहान होते आणि ते एक सहाय्यक होते. त्यांनी मला खूप सभ्य आणि सौजन्याने प्रपोज केले. मोटी, आय लव्ह यू असं ते म्हणाले पण मी नाही म्हणाले. मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचंय. मला कुठेतरी पोहोचायचंय, असे मी म्हणाल्याचे मुमताज यांनी मुलाखतीत सांगितले.  ते माणूस म्हणून खूप चांगले होते. त्यांच्यासारखे खूप कमी चांगले लोक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांचा मुलगा आदित्यदेखील आता एक चांगला दिग्दर्शक आहे. ते माझ्यावर वाईन मारायचे असे नाही. ते खूप सभ्य होते. मी त्यांच्या लग्नालाही गेले होते, असे मुमताज यांनी सांगितले. मुमताज यांनी 1974 मध्ये व्यावसायिक मयूर माधवानीशी लग्न केले आणि त्यांना दोन मुली आहेत. लग्नानंतर त्यांनी 13 वर्षे अभिनयापासून ब्रेक घेतला.

Read More