बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपट नवरा माझा नवसाचा 2 (Navra Maza Navsacha 2) चित्रपटाला चांगलं यश मिळालं आहे. तसंच नुकताच प्रदर्शित झालेला धर्मवीर 2 (Dharmveer) चित्रपटही चांगली कामगिरी करत आहेत. ज्युनिअर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणारा 'देवरा' चित्रपटाचं आव्हान असतानाही दोन्ही मराठी चित्रपटांची यशस्वी घोडदौड सुरु आहे. दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंत किती कमाई केली आहे जाणून घ्या.
'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटासमोर नुकतंच प्रदर्शित झालेल्या धर्मवीर 2 आणि देवराचं आव्हान असतानाही यशस्वी कामगिरी करत आहे. खासकरुन शनिवारी आणि रविवारी चित्रपटाने चांगली कमाई केली.
दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने शुक्रवारी 51 लाख, शनिवारी 1 कोटी 26 लाख आणि रविवारी 1 कोटी 67 लाखांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात 11.74 कोटी कमावणाऱ्या नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात 3.44 कोटींची गल्ला जमवला आहे. आतापर्यंत चित्रपटाने एकूण 15.18 कोटी कमावले आहेत.
The #Marathi entertainer #NavraMazaNavsacha2 held its ground in Weekend 2, especially on Saturday and Sunday, despite stiff competition from #Devara and the #Marathi film #Dharmaveer2.
— taran adarsh (@taran_adarsh) September 30, 2024
[Week 2] Fri 51 lacs, Sat 1.26 cr, Sun 1.67 cr. Total: ₹ 15.18 cr. Nett BOC. #Boxoffice… pic.twitter.com/L1ptcioSRQ
धर्मवीर 2 चित्रपटही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. स्त्री 2, देवरा आणि नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटांचं आव्हान असताना शनिवारी चित्रपटाने चांगली कामगिरी केली. रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाईत 31.77 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. ओपनिंग विकेंडला चित्रपटाने चांगली कमाई केली असून, इतर चित्रपटांसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे.
HIGHEST *WEEKEND 1* OF 2024 - MARATHI FILMS... #Marathi film #Dharmaveer2 [#DharmaveerMukkamPostThane2] delivers an EXCELLENT TOTAL in its opening weekend, successfully withstanding competition from multiple films in the marketplace.
— taran adarsh (@taran_adarsh) September 30, 2024
With a strong total in hand, all that's… pic.twitter.com/TtSMZyKA73
रिलीज झाल्यानंतर चित्रपटाने शुक्रवारी 1.92 कोटी, शनिवारी 2.53 कोटी आणि रविवारी 3.47 कोटींची कमाई केली. तीन दिवसांत चित्रपटाने 7 कोटी 92 लाख कमावले आहेत. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला सुट्टी असल्याने कमाईवर त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
नवरा माझा नवसाचा 2 आणि धर्मवीर 2 च्या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीला सुखद धक्का मिळाला आहे.