Marathi News> मनोरंजन
Advertisement

BREAKING : Dilip Kumar Death : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

BREAKING : Dilip Kumar Death : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. हिंदुजा रूग्णालयात दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. दिलीप कुमार यांची तब्बेत गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होती. हिंदुजा रूग्णालयातच त्यांना याआधी दाखल करण्यात आलं होतं. (BREAKING : Legendary Actor Dilip Kumar dies )  सकाळी साडे सात वाजता दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. 

दिलीप कुमार यांच्यासोबत सायरा बानो देखील रूग्णालयात होत्या. दिलीप कुमार यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत पत्नी सायरा बानो त्यांच्यासोबत होत्या. सायरा बानो यांनी याआधी अनेकदा दिलीप कुमार यांच्या प्रकृतीसाठी चाहत्यांना प्रार्थना करण्यास सांगितलं.

दिलीप कुमार यांना 29 जून रोजी हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिलीप कुमार यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता. दिलीप कुमार यांचं निधन हा संपूर्ण सिनेसृष्टीसाठी मोठा धक्का आहे. गेल्यावर्षी दिलीप कुमार यांनी आपल्या दोन भावांना गमावलं आहे. 88 वर्षांचे असलम खान आणि 90 वर्षांचे एहसान खान यांच कोरोनामुळे निधन झालं होतं. यामुळे दिलीप कुमार यांना आपला वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस देखील साजरा केला नव्हता. 

Read More