Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनिल कपूरच्या मुलीचं 'राधे माँ'सोबत नेमकं काय नातं? पाहा नेटकरी काय म्हणतायत

रिया कपूरच्या नावानं का सुरु आहे इतका गोंधळ? 

अनिल कपूरच्या मुलीचं 'राधे माँ'सोबत नेमकं काय नातं? पाहा नेटकरी काय म्हणतायत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिची बहीण रिया कपूर (Rhea Kapoor) हिचा विवाहसोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. अतिशय छोटेखानी आणि तितक्याच अनोख्या अंदाजात तिचा हा विवाहसोहळा पार पडला. 

विवाहसोहळ्यानंतर रियासाठी एका खास रिसेप्शनचंही आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी कपूर कुटुंबीयांनी हजेरी लावली. तिथं रिसेप्शन सोहळ्याची रंगत वाढत गेली आणि इथं या सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले. 

काही फोटो कपूर कुटुंबातील सदस्यांनीच पोस्ट केले. ज्यानंतर अनेक नेटकऱ्य़ांनी नव्या नवरीची म्हणजेच रिया कपूर हिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. रियानं स्वत:च्याच इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेल्या फोटोमुळं ट्रोलिंगचा शिकार झाली. 

पांढऱ्या रंगाचा पायघोळ स्कर्ट, त्यावर लाल रंगाच्या अक्षरात बरंच काही लिहिलेलं डिझाईन, लाल लंगाचा पूर्ण बाह्यांचा टी शर्ट, लांब सडक मोकळे केस आणि कपाळावर टिळा अशा रुपातला फोटो रियानं शेअर केला आणि बस्स, नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)

काहींनी रियाची प्रशंसा करत तिच्या स्टाईल स्टेटमेंटला दाद दिली. पण, यामध्ये तिच्यावर निशाणा साधणारे जास्त होते. तिचा हा लूक पाहून ही तर, राधे माँ सारखी दिसतेय अशा कमेंट अनेकांनी केल्या. तिच्या पायाला असणारा अलता आणि संपूर्ण रुप पाहून रिया राधे माँ प्रमाणंच दिसतेय, अशाही कमेंट तिच्या या पोस्टवर आल्या. तर, काहींनी रियाला कमेंटमधूनच स्टाईलचे धडे देण्यास सुरुवात केली. 

Read More