Marathi News> मनोरंजन
Advertisement

Cannes 2019 VIDEO : रेड कार्पेटवर दीपिकाची जबरदस्त एन्ट्री

Cannes 2019 मधील दीपिकाचा रेड कार्पेट लुक

Cannes 2019 VIDEO : रेड कार्पेटवर दीपिकाची जबरदस्त एन्ट्री

नवी दिल्ली : चंदेरी दुनियेतील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कान चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या रेड कार्पेटवर भारतीय अभिनेत्रींनेही धमाकेदार एन्ट्री केली आहे. मेट गाला २०१९ मध्ये केलेल्या बार्बी लुकनंतर आता दीपिकाचा 'कान'च्या रेड कार्पेटवरील जबरदस्त लुक समोर आला आहे. मेट गाला २०१९ नंतर दीपिकाने पुन्हा एकदा 'Cannes 2019'मध्ये आपल्या अदांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. ७२व्या 'कान फिल्म फेस्टिवल'मध्ये दीपिका काळ्या आणि क्रिम रंगाच्या गाउनमध्ये रेड कार्पेटवर उतरली आणि सर्वांच्याच नजरा दीपिकावर खिळल्या. 

 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

fallbacks

कान फेस्टिवलमध्ये दीपिकाच्या लुकबाबत चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. अखेर दीपिकाचा 'कान'मधील रेड कार्पेट लुक समोर आला. दीपिकाच्या या जबरदस्त एन्ट्रीला चांगलीच पसंती मिळत आहे. दीपिकाने डिझायनर पीटर डुंडास यांनी डिझाइन केलेला काळ्या आणि क्रिम रंगाचा गाउन परिधान केला होता. त्यासोबत तिने हाय पोनी टेल, हिल्स, ड्रॉप ड्रॅग्लर ज्वेलरी, डोळ्यांचा भडक मेकअप असा लुक केला होता. 

fallbacks

fallbacks

दीपिका नेहमीच तिच्या लुकमुळे चर्चेत असते. २०१० मध्ये झालेल्या कान फिल्म फेस्टिवलमधील दीपिकाचा रेड कार्पेट लुक चांगलाच व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा या हटके लुकमुळे दीपिका चर्चेत आहे. दीपिका मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटात अॅसिड अॅटॅक पिडितेच्या भूमिकेत दिसणार आहे. १० जानेवारी २०२०मध्ये छपाक प्रदर्शित होणार आहे.

Read More