Marathi News> मनोरंजन
Advertisement

Captain Marvel : दीपिका नव्हे तर प्रियांका चोप्राची 'कॅप्टन मार्वल'मध्ये वर्णी?

रुसो ब्रदर्स सध्या भारतात 'द ग्रे मॅन' चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.

Captain Marvel : दीपिका नव्हे तर प्रियांका चोप्राची 'कॅप्टन मार्वल'मध्ये वर्णी?

मुंबई : रुसो ब्रदर्स सध्या भारतात 'द ग्रे मॅन' चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. 'कॅप्टन अमेरिका' आणि 'अ‍ॅव्हेंजर्स' सिरीज हे चित्रपट दिग्दर्शित केलेले रुसो ब्रदर्स देसी गर्ल प्रियांका चोप्राचे खूप चांगले मित्र आहेत. अगदी अलीकडे, अशी बातमी आली आहे की, भावांची ही जोडी 'कॅप्टन मार्वल'साठी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राची निवड करू शकते.

प्रियांका कॅप्टन मार्वलच्या भूमिकेत चमक दाखवेल का?
अलीकडेच प्रियांकाच्या एका फॅन पेजने रुसो ब्रदर्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अँथनी रुसो आणि जोसेफ रुसो म्हणजेच रुसो ब्रदर्सच्या जोडीला विचारण्यात आलं होतं की, जर त्यांना नवीन कॅप्टन मार्वलची निवड करायची असेल, तर ते प्रियंका चोप्रा किंवा दीपिका पदुकोण यांच्यापैकी कोणाची निवड करतील? हा प्रश्न ऐकून दोघांनीही क्षणाचाही विलंब न लावता प्रियांका चोप्राचं नाव घेतलं. तथापि, या मुलाखतीदरम्यान, रुसो ब्रदर्सने असंही सांगितलं की, ते प्रियांका चोप्राचे खूप चांगले मित्र आहेत आणि ते तिच्या 'सिटाडेल' शोची निर्मिती देखील करत आहेत.

प्रियंकाचे चाहते एक्साइटेड 
रुसो ब्रदर्सची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मार्व्हलमध्ये प्रियंका दिसू शकते, असं त्यांनी सांगताच. तिला सुपर वुमनच्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. इतकंच नाही तर प्रियांकाचे चाहते तिला कॅप्टन मार्वलच्या रुपात पाहू लागले असून सोशल मीडियावर फोटोशॉपच्या मदतीने देसी गर्ल सुपर वुमनच्या अवतारात दाखवत आहेत.

बॉलीवूडमधून ही भूमिका फक्त तीच साकारू शकते, असे प्रियांकाचे चाहते सांगत आहेत. तर त्याचबरोबर काही चाहते प्रियांका काहीही करू शकते असंही म्हणताना दिसत आहेत. काही चाहत्यांनी असंही म्हटलं आहे की, अॅक्शन रोलमध्ये प्रियांकाला कोणीच तोड  नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या दोघीही बॉलिवूडमधील मोठी नावं आहेत. या दोन्ही अभिनेत्रींनी हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटासाठी दोघांनी पुढे येणं ही फार मोठी गोष्ट नव्हती. पण रुसो ब्रदर्सच्या मुलाखतीवरून हे स्पष्ट झालं आहे की, भविष्यात मार्वलसाठी कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला कास्ट करण्याचा विचार केला तर ती नक्कीच प्रियंका चोप्रा असेल.

Read More